शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:56 IST

मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाने संपूर्ण जग इंधन टंचाइचा सामना करताना दिसत आहे. यातच आता, भारताचा जुना मित्र असलेला रशिया मदतीसाठी सरसावला आहे. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतुरोव यांनी गुरुवारी भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. 'एक्स'वर पोस्ट करत ते म्हणाले, "रशियाच्या उपपंतप्रधानांसोबत व्यापार, खते, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील सहकार्य आदी विविध विषयांवर चर्चा झाली. गेल्या डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या भारत-रशिया शिखर परिषदेच्या निष्कर्षांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. मंतुरोव्ह आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली.

भारताची गरज पूर्ण करण्यासाठी रशिया तयार -यासंदर्भात रशियन दूतावासाने निवेदन जारी करत म्हटले आहे, "मांतुरोव यांनी पुष्टी केली आहे की, रशियन कंपन्या भारताला तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) चा पुरवठा सातत्याने वाढवण्यास सक्षम आहेत. २०२५ च्या अखेरीस रशियाने भारताला लागणाऱ्या खनिज खतांच्या पुरवठ्यात ४० टक्क्यांनी वाढ केली असून, भविष्यातील गरजा पूर्ण करण्याची तयारीही दर्शवली आहे.

होर्मुजच्या नाकेबंदीवर उपाय -इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाला आहे. भारत साधारणपणे आपली ९० टक्के ऊर्जा गरज याच मार्गावरून पूर्ण करतो. मात्र, हा मार्ग बंद झाल्याने अनेक जहाजे अडकून पडली आहेत. यावर उपाय म्हणून भारताने रशिया, व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून तेल खरेदी वाढवली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Russia to help India with oil and fertilizer amid crisis.

Web Summary : Amid global energy concerns, Russia offers India increased oil and fertilizer supplies. Deputy Prime Minister Manturov met with PM Modi, pledging support and discussing enhanced cooperation in key sectors to address India's needs.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाCrude Oilखनिज तेलIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका