रशिया मैत्रीला जागला! १-२ नव्हे तर तब्बल ७ जहाजांनी बदलला मार्ग; चीनऐवजी भारताकडे येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:57 IST2026-03-18T17:54:31+5:302026-03-18T17:57:11+5:30

अमेरिकेने सूट दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून तब्बल ३० मिलियन बॅरल तेल खरेदी केले आहे

Not 1-2 but 7 Russia ship diverted route to India; Will come to India instead of China, Russia awakens to friendship | रशिया मैत्रीला जागला! १-२ नव्हे तर तब्बल ७ जहाजांनी बदलला मार्ग; चीनऐवजी भारताकडे येणार

रशिया मैत्रीला जागला! १-२ नव्हे तर तब्बल ७ जहाजांनी बदलला मार्ग; चीनऐवजी भारताकडे येणार

नवी दिल्ली - चीनच्या दिशेने जाणारे रशियन तेल टँकर दक्षिण चीन समुद्रातून माघारी फिरले आहेत. हे टँकर भारताच्या दिशेने वेगाने पुढे येत आहेत. कारण भारतानेरशियाकडून तेल आयात दुप्पट केली आहे. रशियन तेलाबाबतच्या रिपोर्टमुळे चीनला धक्का बसला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी आणखी वाढवली आहे. ज्यामुळे चीनला जाणारे जहाज पुन्हा भारताच्या दिशेने वळले आहेत. यातील एक जहाज २१ मार्च रोजी न्यू मँगलोरला पोहचणारे आहे. जहाजाच्या ट्रॅकिंग डेटात या जहाजाने जानेवारीच्या अखेरीस बाल्टिक सागरात सामान भरले होते. जेव्हा हे जहाज लोड करण्यात येत होते तेव्हा ते चीनच्या रिझाओ बंदराला जाणार होते. परंतु मार्चमध्ये दक्षिण पूर्ण आशियाई सागरी क्षेत्रात या जहाजाने त्याचा मार्ग बदलला. रशियन तेलाच्या खरेदीवरील निर्बंध तात्पुरते हटवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. ज्यामुळे चीनला जाणारी जहाजे भारताच्या दिशेने येत आहेत.

आठवड्याला ३० मिलियन बॅरल तेल

अमेरिकेने सूट दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून तब्बल ३० मिलियन बॅरल तेल खरेदी केले आहे. यामुळे इराण युद्धाच्या काळात भारताची ऊर्जेची गरज भागली आहे आणि देशातील गॅस संकटावर मात करण्यास मदत झाली आहे.

इतर देशही रशियाकडून करताहेत तेल खरेदी

अमेरिकेने निर्बंध हटवल्यानंतर इतर देशांनीही रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. पूर्वी फक्त चीन रशियाकडून तेल खरेदी करत असे पण आता इतर देशही रशियन तेल खरेदी करतील. ज्यामुळे चीनची रशियाकडून होणारी तेलाची आयात कमी होईल. जपान आणि दक्षिण कोरियासह इतर खरेदीदारांच्या मागणीमुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

७ जहाजे भारतात येणार

दरम्यान, रशियन तेल वाहून नेणाऱ्या किमान सात तेल टँकर्सनी त्यांच्या प्रवासात चीनकडून भारताकडे आपला मार्ग बदलला आहे आणि भारतातील सर्व प्रमुख तेल शुद्धीकरण कंपन्या आता देशाच्या कच्च्या तेलाच्या बाजारात उतरल्या आहेत. याव्यतिरिक्त सुएझमॅक्स 'झुझोउ एन' हा टँकर भारतातील सिक्का येथे पोहचणार आहे. जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार तो २५ मार्च रोजी तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. केप्लरच्या मते हा टँकर कझाक सीपीसी ब्लेंड कच्चे तेल घेऊन जात आहे. 

Web Title : सात जहाजों का मार्ग परिवर्तन: चीन से भारत, रूस की दोस्ती!

Web Summary : सात रूसी तेल टैंकर, जो पहले चीन जा रहे थे, भारत की ओर मुड़ गए। अमेरिका द्वारा अस्थायी प्रतिबंधों में ढील के बाद भारत ने रूस से तेल का आयात बढ़ाया, जिससे यह बदलाव आया। भारतीय रिफाइनर ने 30 मिलियन बैरल साप्ताहिक खरीदा, जिससे ऊर्जा जरूरतों को मदद मिली। अन्य राष्ट्र भी रूस के तेल व्यापार में शामिल हुए।

Web Title : Seven Ships Change Course: From China to India, Russia Delivers!

Web Summary : Seven Russian oil tankers, initially headed for China, rerouted to India. Increased Indian oil imports from Russia, spurred by temporary US sanctions relief, prompted the change. Indian refiners bought 30 million barrels weekly, aiding energy needs. Other nations join Russia's oil trade, impacting China's share.