Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने केली उत्तराधिकाऱ्याची निवड? कोण आहे ती व्यक्ती…
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:17 IST2022-11-28T15:16:37+5:302022-11-28T15:17:59+5:30
Kim Jong Un: सलग दोनदा किम जोंग उन हा वेळा मुलीसह दिसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच त्याने मुलीची आपली उत्तराधिकारी म्हणून निवड केली का अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने केली उत्तराधिकाऱ्याची निवड? कोण आहे ती व्यक्ती…
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा त्याच्या सनकी आणि विक्षिप्त निर्णय आणि शक्तिप्रदर्शनामुळे नेहमी चर्चेत असतो. आता किम जोंग हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किम जोंग उन हा दुसऱ्यांदा त्याच्या मुलीसह दिसला होता. १८ नोव्हेंबर रोजी मिसाईल परीक्षणादरम्यान किमसोबत त्याची मुलगी उपस्थित होती. किम जोंग उन हा त्याचं खासगी आयुष्य नेहमीच गोपनीय ठेवत आला आहे. मात्र आता सलग दोनदा किम जोंग उन हा वेळा मुलीसह दिसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच त्याने मुलीची आपली उत्तराधिकारी म्हणून निवड केली का अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंगची मुलगी त्याची उत्तराधिकारी बनणार आहे. त्यासाठी तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र सध्यातरी या केवळ चर्चाच आहेत. त्यांना अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही. किम जोंग उनसोबत त्यांच्या मुलीला सर्वानी पाहिलं आहे. मात्र आतापर्यंत तिच्याबाबत अधिक माहिती कुणालाही नाही आहे. कोरिया सेंट्रल एजन्सी किंवा कुणीही अधिकृत सूत्रांनी किम जोंग उनच्या मुलीचं नाव उघड केलेलं नाही.
माहितगारांच्या मते किम जोंग उनच्या मुलीचं नाव जू-ए आहे. याबाबत सर्वप्रथम गौप्यस्फोट रिटायर्ड एनबीए खेळाडू डेनिस रोडमेन याने केला होता.