इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:18 IST2025-06-20T16:17:04+5:302025-06-20T16:18:22+5:30

उत्तर कोरियाने केवळ इस्रायलवरच टीका केली नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप केले आहेत.

north korea kim jong un entry in Iran-Israel war threatens to Donald Trump and Netanyahu | इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

इराण-इस्रायल संघर्ष शिगेला पोहोचला असून मध्यपूर्वेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्योंगयांगच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इराणच्या नागरी, अणु आणि ऊर्जा तळांवर केलेल्या हल्ल्यांसंदर्भात एक निवेदन जारी करत, "हा मानवतेविरुद्धचा अक्षम्य गुन्हा असून प्रदेशाला एक नव्या व्यापक युद्धाकडे ढकलत असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरीयाचे अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप -
उत्तर कोरियाने केवळ इस्रायलवरच टीका केली नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका आणि युरोपीय देश देखील या गुन्ह्यात संयुक्त भागीदार आहेत आणि राज्य-पुरस्कृत दहशतवादाला संरक्षण देत आहेत, असे उत्तर कोरीयाने म्हटले आहे. 

मध्य पूर्वेच्या शांततेसाठी कर्करोग... -
एवढेच नाही तर, अमेरिका आणि पाश्चात्य देश, इस्रायलच्या सोबतीने मध्य पूर्वेच्या शांततेसाठी कर्करोग बनत आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय समुदाय, पीडित इराणचे सार्वभौमत्व आणि स्वसंरक्षणाचा अधिकार सातत्याने नाकारण्याचा प्रयत्न करत असलेल्या अमेरिका आणि पश्चिमेकडे लक्ष ठेवून आहे," असे उत्तर कोरीयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचं विधान अन् उत्तर कोरियाचा इशारा -
अमेरिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, इराणसंदर्भात आपले धैर्य आता संपले आहे. त्यांनी ही स्थिती आणखी संवेदनशील बनवली आहे. याला उत्तर देत उत्तरकोरीयाने म्हटले आहे, आपली कारवाई मध्य पूर्वेला विनाशाकडे घेऊन जात आहे. उत्र कोरीयाच्या या विधानावरून इराण आणि उत्तर कोरीया दोघेही असंतुष्ट असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: north korea kim jong un entry in Iran-Israel war threatens to Donald Trump and Netanyahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.