शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बीजिंगमध्ये किम जोंग उन-शी जिनपिंग यांची भेट, अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत सकारात्मक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 9:41 AM

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली. या भेटीनं जगाला आश्चर्यचकीत केले आहे.

बीजिंग -  उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली. चीन सरकारे अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या 'शिन्हुआ'नं उत्तर कोरिया व चीनच्या शिष्ठमंडळादरम्यान झालेल्या चर्चेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहेत.  या भेटीमध्ये किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्प केल्याचे वृत्त असून कोरियन द्विपकल्पात शांतता राहावी, यासंदर्भातही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं किम जोंग उन यांनी बैठकीनंतर सांगितले, तसंच ते दोन्ही देशांचं एक संयुक्त संमेलनही भरवण्यास इच्छुक आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणालेत की, बदललेल्या या परिस्थितींमध्ये ते उत्तर कोरियाशी नियमित स्वरुपातील संपर्क ठेऊ इच्छितात. उत्तर कोरियासोबत विभिन्न माध्यामांद्वारे संपर्क वाढवण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. 

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनला गुप्त भेट दिल्याची चर्चा रंगली होती. किम जोंग हे विशेष रेल्वे ट्रेनने चीनला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. चीननेही किम जोंग उन यांच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नाही, असे म्हटले होते. जर ते चीन दौऱ्यावर असतील तर त्याची माहिती लवकरच प्रसारित केली जाईल, असे चीनच्या वतीने सांगण्यात आले होते.

यानुसार, चीनमधील वृत्तसंस्थेने अखेर किम जोंग उन यांच्या चीन दौऱ्याबाबत वृत्त दिले आहे. या दौऱ्यात किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्पही केला. या मोबदल्यात चीनने उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले. 

 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनchinaचीनAmericaअमेरिका