या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:46 IST2025-10-06T19:46:16+5:302025-10-06T19:46:47+5:30

ब्रूंको या इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स बॉयोलॉजी शी संबंधित आहेत. तर रॅम्सडेल सोनोमा बायोथेरेपॅटिक्सशी संबंधित आहेत. तर साकागुची हे ओसाका युनिव्हर्सिटी जापानमध्ये कार्यरत  आहेत.

Nobel Prize Winners 2025 Nobel Prize in Medicine announced, joint honor to to mary e brunkow fred ramsdell and shimon sakaguchi japan | या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

नोबेलच्या पहिल्या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. वैद्यकीय अथवा मेडिसिन क्षेत्रातील तीन दिग्गजांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे सिएटल शहरातील मेरी ई ब्रूंको, सॅन फ्रान्सिस्को येथील फ्रेड रॅम्सडेल आणि जापानच्या शिमोन साकागुची, या तीन जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रूंको या इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स बॉयोलॉजी शी संबंधित आहेत. तर रॅम्सडेल सोनोमा बायोथेरेपॅटिक्सशी संबंधित आहेत. तर साकागुची हे ओसाका युनिव्हर्सिटी जापानमध्ये कार्यरत  आहेत.

'पेरिफेरल इम्यून टॉलरन्स' संबंधीच्या त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे -
नोबेल प्राइझच्या अधिकृत एक्स हँडलवर एका पोस्टद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, मेरी ई. ब्रूंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांनी रोगप्रतिकारक शक्ती कशी नियंत्रित केली जाते यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यांना 'पेरिफेरल इम्यून टॉलरन्स' संबंधी त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

या शोधाने वैद्यकशास्त्रात संशोधनाच्या नव्या क्षेत्राचा पाया घातला असून, कर्करोग आणि स्वयंप्रतिकार रोगांवरील नवीन उपचारांच्या विकासाला प्रेरित केले आहे. हा पुरस्कार या तिघांच्याही अतुलनीय योगदानाचा सन्मान आहे. तसेच, वैद्यकशास्त्रातील भविष्यातील प्रगतीसाठी प्रेरणा देणारा आहे.

Web Title : चिकित्सा में नोबेल पुरस्कार अमेरिकी और जापानी शोधकर्ताओं को

Web Summary : चिकित्सा में नोबेल पुरस्कार संयुक्त रूप से दो अमेरिकी और एक जापानी शोधकर्ता को दिया गया। ये हैं मैरी ई. ब्रंको, फ्रेड रैमस्डेल और शिमोन साकागुची। यह पुरस्कार परिधीय प्रतिरक्षा सहिष्णुता के बारे में उनकी खोजों को मान्यता देता है, जिससे कैंसर और ऑटोइम्यून बीमारियों के नए उपचार का मार्ग प्रशस्त होता है।

Web Title : Nobel Prize in Medicine Awarded to US and Japanese Researchers

Web Summary : The Nobel Prize in Medicine was jointly awarded to two US and one Japanese researcher. They are Mary E. Brunkow, Fred Ramsdell, and Shimon Sakaguchi. The award recognizes their discoveries concerning peripheral immune tolerance, paving the way for new cancer and autoimmune disease treatments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.