शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

मलाला युसूफझाई अडकली लग्नबंधनात; बर्मिंगहॅममध्ये साध्या पद्धतीने पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 8:09 AM

Malala Yousafzai Marriage: बर्मिंगहॅम येथील निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान दिवस असल्याचे मलाला युसूफझाईने म्हटले आहे.

बर्मिंगहॅम : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई (Nobel Peace Prize laureate Malala Yousafzai) लग्नबंधनात अडकली आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये असर मलिक (Asser Malik) यांच्यासोबत तिने लग्न केले. मलाला युसूफझाईने ट्विटद्वारे ही माहिती दिली. बर्मिंगहॅम येथील निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान दिवस असल्याचे मलाला युसूफझाईने म्हटले आहे.

मलाला युसूफझाईने ट्विट केले की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभरासाठीचे जोडीदार होण्यासाठी लग्नगाठ बांधली.' तसेच, तिने लग्न समारंभातील काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. मात्र, तिने आपल्या पतीबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. दरम्यान, असर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक आहेत. मलाला युसूफझाईचा जगाच्या अनेक भागात आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये तिच्या निर्भयपणामुळे आणि महिलांच्या हक्कांसाठी काम केल्याबद्दल आदर केला जातो. मात्र, त्याच्या पाकिस्तानात तिच्या कामाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत.

2012 साली 15 वर्षांची असताना मुलींच्या शिक्षण हक्काबद्दल पाकिस्तानमध्ये बोलल्याप्रकरणी मलाला युसूफझाईला तालिबानने लक्ष्य केले होते. तालिबानी कट्टरतावाद्याने स्वात खोऱ्यातल्या मलाला युसूफझाईच्या स्कूलबसमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मलाला युसूफझाईसह तिच्या मैत्रिणीही जखमी झाल्या होत्या. जीवावर बेतलेल्या अशा प्रसंगातून बरी झाल्यानंतर मलाला युसूफझाई आणि तिच्या घरचे इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे स्थायिक झाले. वयाच्या 17 व्या वर्षी तिला नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले होते.  मलाला युसूफझाई सगळ्यांत लहान वयाची नोबेल पुरस्कारविजेती ठरली होती.

तीन महिन्यांपूर्वीच लग्नावर प्रश्न उपस्थित केले होतेया वर्षी जुलैमध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलाला युसूफझाईने विवाह पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले होते. व्होग या ब्रिटीश मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, "लोकांना लग्न का करायला लागते हे समजत नाही. जर तुम्हाला आयुष्यासाठी जोडीदार हवा असेल तर तुम्हाला कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या का कराव्या लागतात? तुमचे सहजीवन असेच का सुरू होऊ शकत नाही?". दरम्यान, मलाला युसूफझाईच्या या विधानावर पाकिस्तानमधून जोरदार टीका झाली.

टॅग्स :Malala Yousafzaiमलाला युसूफझाईmarriageलग्न