ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:16 IST2026-04-08T18:13:18+5:302026-04-08T18:16:52+5:30
दरम्यान, गेली ४० दिवस एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागणारे हे दोन्ही देश आता सहकार्याची भाषा करत असल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, हे सत्ता परिवर्तन आणि सहकार्य किती काळ टिकेल, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी, ट्रम्प यांच्या या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
अमेरिका आणि इराणमधीलयुद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. यानंतर, आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "अमेरिका आणि इराण आता एकत्रितपणे काम करतील. सोशल मीडियावर पोस्ट करताना ट्रम्प म्हटले, इराणमध्ये यशस्वी सत्तापालट झाले आहे. या पुढे इराणमध्ये युरेनियम संवर्धन केले जाणार नाही." एवढेच नाही तर, "भूमिगत आण्विक सामग्री काढण्यासाठी अमेरिका इराणसोबत काम करेल," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
१५ पैकी अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती -
ट्रम्प पुढे म्हणाले, "संपूर्ण परिसरात उपग्रहाद्वारे (Satellite) कडक नजर ठेवली जात आहे. हल्ल्यांनंतर संबंधित ठिकाणांवर कोणतीही संशयास्पद हालचाल झालेली नाही." तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी 'टॅरिफ' आणि लादलेले 'निर्बंध' शिथिल करण्यासंदर्बातही सकारात्मक चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, १५ पैकी अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.