"आता चर्चा नाही, फक्त बदला!" पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबानचा थरकाप उडवणारा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:15 IST2026-03-17T11:14:50+5:302026-03-17T11:15:14+5:30
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तानमधील काबूल येथील एका अमली पदार्थ पुनर्वसन केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ४०० हून अधिक लोक ठार झाले.

"आता चर्चा नाही, फक्त बदला!" पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबानचा थरकाप उडवणारा इशारा
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उलट, परिस्थिती बिघडत आहे. नुकतेच, सोमवारी रात्री उशिरा, पाकिस्ताननेअफगाणिस्तानमधील काबूल येथील एका अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्राला लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर तालिबानने प्रत्युत्तर दिले . संवाद आणि राजनैतिक चर्चेची वेळ आता संपली आहे, असे स्पष्ट तालिबानने पाकिस्तानला सांगितले आहे. यामुळे आता या दोन्ही देशात पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी हल्ल्यांनंतर, तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाटाघाटींची वेळ संपली आहे, राजनय किंवा वाटाघाटी यांपैकी काहीही कामाचे नाही. आता फक्त पाकिस्तानचा बदला घ्यायचा आहे असे तालिबानने सांगितले आहे.
इराण शक्तीहीन...! युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल, ड्रोन; आता आकडा एकेरीवर आला...
तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने काबूलमधील अनेक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांनंतर, इस्लामाबादसोबत राजनैतिक चर्चा आणि संवाद साधण्याची वेळ निघून गेली आहे. ते म्हणाले की, संवाद साधण्याऐवजी, त्यांचा बदला घेण्याचा इरादा आहे.
अफगाणिस्तानमध्ये हा हल्ला कुठे झाला?
पाकिस्तानी सैन्याने काबूलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावर एकाच वेळी अनेक बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात २,००० लोक होते. त्यापैकी ४०० जणांचा मृत्यू झाला, तर २५० जण गंभीर जखमी झाले. अनेक जण चिंताजनक अवस्थेत असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. पाकिस्तानने व्यसनमुक्ती केंद्राव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणीही हल्ले केले. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला.
एका महिन्यात परिस्थिती बदलली
२१ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर वारंवार हल्ले केले आहेत. दोन्ही देशांच्या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर हजारो लोकांना आपली घरे सोडून पलायन करण्यास भाग पडले आहे.