"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:14 IST2025-06-21T12:13:56+5:302025-06-21T12:14:36+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे...

No matter how much I try for peace Donald Trump sadness after the Congo-Rwanda peace agreement, expressed his desire for the Nobel Prize | "मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर, भारतानेपाकिस्तानला प्रत्त्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर चालवले. दरम्यान दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा झाली. तेव्हापासूनच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच चर्चेत आहेत. आपल्यामुळेच जगातील दोन अण्वस्त्र संपन्न देशांत युद्धविराम झाला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला आहे. मात्र त्यांचा हा दावा, भारताने फेटाळला आहे. यातच, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक अंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. या घटनांसंदर्भात ते आपल्या योगदानाचा दावा करतात. या पोस्टमध्ये त्यांनी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रिपब्लिक ऑफ रवांडा यांच्यातील करारासाठी शांतता पुरस्कार मिळवणे, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखणे, सर्बिया आणि कोसोवोमधील युद्ध रोखणे, इजिप्त आणि इथिओपिया यांच्यात शांतता राखणे तथा इस्रायल आणि अरब देशांमधील शांतता करार (अब्राहम करार) यासंदर्भात भाष्य केले आहे." तसेच, एवढे सारे प्रयत्न करूनही, नोबेल समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केले, मात्र, जनतेला माहीत आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आसिम मुनीर यांना दिलं होतं जेवणाचं आमंत्रण -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच, पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना व्हाईट हाऊस येथे दुपारच्या जेवणाचे आमंत्रित केले होते. यावेळी दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली. ही भेट मोठा चर्चेचा विषय ठरली होती. भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर, ट्रम्प यांनी पहिल्यांदाच एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटीसाठी बोलावले होते. मात्र, असे असले तरी, असीम मुनीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समजदारी भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी उपयुक्त ठरली, असेही ट्रम्प म्हणाले होते.

Web Title: No matter how much I try for peace Donald Trump sadness after the Congo-Rwanda peace agreement, expressed his desire for the Nobel Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.