बंदूक नाही, डिजिटल स्ट्राईक; स्मार्ट कॅमेरे बनले शस्त्र! रक्ताचा थेंबही न सांडता इराणने आंदोलक कसे रोखले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:11 IST2026-01-22T19:08:35+5:302026-01-22T19:11:54+5:30

इराणने आपल्या देशातील तरुण पिढीचा आवाज दाबण्यासाठी चिनी मॉडेलचा वापर करून आंदोलकांना हतबल केले आहे.

No guns, digital strikes; Smart cameras became weapons! How did Iran stop protesters without shedding a drop of blood? | बंदूक नाही, डिजिटल स्ट्राईक; स्मार्ट कॅमेरे बनले शस्त्र! रक्ताचा थेंबही न सांडता इराणने आंदोलक कसे रोखले?

बंदूक नाही, डिजिटल स्ट्राईक; स्मार्ट कॅमेरे बनले शस्त्र! रक्ताचा थेंबही न सांडता इराणने आंदोलक कसे रोखले?

इराणमध्ये अलिकडच्या काळात उसळलेले सरकारविरोधी निदर्शने अनपेक्षितरीत्या आणि अतिशय वेगाने शांत झाली. मात्र, या विद्रोहाचा वणवा विझवण्यासाठी इराणने यावेळी बंदूक किंवा गोळ्यांचा वापर केला नाही, तर चीनकडून मिळालेल्या हायटेक डिजिटल दमन तंत्रज्ञानाचा आधार घेतला. ब्रिटीश वृत्तपत्र 'द संडे टाइम्स'च्या एका खळबळजनक अहवालानुसार, इराणने आपल्या देशातील तरुण पिढीचा आवाज दाबण्यासाठी चिनी मॉडेलचा वापर करून आंदोलकांना हतबल केले आहे.

..अन् विद्रोह संपला!

२०२२ चा हिजाबविरोधी लढा किंवा २०१९ मधील पेट्रोल दरवाढीविरुद्ध झालेली आंदोलने दीर्घकाळ चालली होती. मात्र, यावेळी चित्र वेगळे होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने चीनच्या मदतीने एक अशी भिंत उभी केली, जिथे आंदोलक रस्त्यावर उतरण्यापूर्वीच सरकारला त्यांची माहिती मिळत होती. लेखक बोयेस यांच्या मते, ही युती आता लोकशाहीवादी आंदोलकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

रशिया आणि उत्तर कोरियाचीही साथ

या डिजिटल युद्धात इराणला केवळ चीनचीच नव्हे, तर रशिया आणि उत्तर कोरियाचीही मोलाची साथ लाभली आहे. चीन आणि इराणमध्ये आधीच २५ वर्षांचा तंत्रज्ञान आणि सुरक्षा करार झाला आहे. या अंतर्गत चीनने इराणला हजारो स्मार्ट पाळत ठेवणारे कॅमेरे आणि अत्याधुनिक सर्व्हिलन्स सिस्टीम पुरवली आहे. हे कॅमेरे आता इराणच्या गल्लीबोळात बसवण्यात आले आहेत.

असे काम करते 'स्मार्ट' मॉनिटरिंग

इराणमधील हे हायटेक कॅमेरे केवळ चित्रिकरण करत नाहीत, तर ते 'फेस रिकग्निशन' तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसताच, ही यंत्रणा राष्ट्रीय ओळखपत्राच्या डेटाबेसशी संपर्क साधते. काही सेकंदात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि संपूर्ण कुंडली तेहरानमधील कंट्रोल सेंटरला मिळते. अलिकडेच एका आंदोलकाचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो चिनी तंत्रज्ञानावर चालणारे ट्रॅफिक कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न करत होता, यावरूनच या कॅमेऱ्यांची भीती आंदोलकांमध्ये किती आहे, हे स्पष्ट होते.

इंटरनेटवर डिजिटल कुलूप

सध्या इराणच्या रस्त्यांवर शांतता दिसत असली तरी इंटरनेटवर कडक निर्बंध कायम आहेत. या डिजिटल युद्धामुळे आंदोलकांना आपसात संवाद साधणे किंवा माहिती शेअर करणे अशक्य झाले आहे. ते देशात किंवा परदेशात कोणाशीही संपर्क साधून संघटित होऊ शकत नाहीत. या युतीचा हा डिजिटल पहारा आता इराणमधील बदलाचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत आहे.

Web Title : गोली नहीं, डिजिटल स्ट्राइक: स्मार्ट कैमरों से ईरान में प्रदर्शन शांत।

Web Summary : ईरान ने चीनी निगरानी तकनीक का उपयोग करके विरोध प्रदर्शनों को शांत किया, गोलियों से नहीं। फेस रिकग्निशन प्रदर्शनकारियों की पहचान करता है, जिससे संचार और संगठन बाधित होता है। रूस और उत्तर कोरिया ने भी इस डिजिटल कार्रवाई में मदद की, जिससे असंतोष दब गया।

Web Title : No bullets, digital strike: Smart cameras quell Iran protests.

Web Summary : Iran quelled protests using Chinese surveillance tech, not bullets. Face recognition identifies protesters, hindering communication and organization. Russia and North Korea also aided this digital crackdown, stifling dissent.