NYC Helicopter Crash: हेलिकॉप्टर क्रॅश झालं अन् थेट नदीत पडलं, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:08 IST2025-04-11T09:08:08+5:302025-04-11T09:08:41+5:30

New York Helicopter Crash: घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

New York Helicopter Crash News falls directly into Hudson river 6 members of the same family die in America | NYC Helicopter Crash: हेलिकॉप्टर क्रॅश झालं अन् थेट नदीत पडलं, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

NYC Helicopter Crash: हेलिकॉप्टर क्रॅश झालं अन् थेट नदीत पडलं, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

New York Helicopter Crash: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळले आणि थेट हडसन नदीत पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटो-व्हिडिओमध्ये पाण्यात बुडालेले  हेलिकॉप्टर आणि बचावकार्यासाठी वापरत असलेल्या अनेक बोटी घटनास्थळाभोवती फिरत असल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टरचे अवशेष काढण्याचे काम पथके करत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. न्यूयॉर्क पोलिस विभागाने (NYPD) X प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामुळे वेस्ट साइड हायवे आणि हडसन नदीतील स्प्रिंग स्ट्रीटच्या आसपासच्या भागात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एक स्पॅनिश कुटुंब होते, ज्यामध्ये आई-वडील, तीन मुले आणि एक पायलट होता. फ्लाइटरडारच्या आलेखांवरून असे दिसून आले की विमान क्रॅश होण्यापूर्वी सुमारे १५ मिनिटे हवेत होते, त्या दरम्यान ते अनेक वेळा प्रचंड वाऱ्यामुळे हलत होते आणि नंतर हडसन नदीत पडले.

घटनेची चौकशी सुरू

अपघाताचे कारण तपासले जात असल्याचे पोलिस आयुक्त टिश यांनी सांगितले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीवरून उत्तरेकडे जाण्याऐवजी दक्षिणेकडे गेले. नंतर न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर दक्षिणेकडे परतले, जिथे ते कोसळले. कमिशनर टिश म्हणाले की, बहुतेक प्रवाशांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. मॅनहॅटन ओलांडून हडसन नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या जर्सी सिटीमधील आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

हडसन नदीवर यापूर्वीही घडल्यात अशा घटना

हडसन नदीत हेलिकॉप्टर अपघात होणे नवीन नाही. २००९ मध्ये, नदीवर एक विमान आणि एक पर्यटक हेलिकॉप्टरची टक्कर झाली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये, 'ओपन डोअर' उड्डाणे देणाऱ्या एका चार्टर हेलिकॉप्टरच्या अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता. २००९ पासून हडसनमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: New York Helicopter Crash News falls directly into Hudson river 6 members of the same family die in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.