सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:08 IST2025-12-15T10:07:20+5:302025-12-15T10:08:05+5:30
हा दहशतवादी हल्ला घडवणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला चाललोय असं सांगितले.

सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर अंदाधुंद गोळीबारात १६ लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे दोघेही बाप-लेक आहेत. सिडनीच्या बाँडी बीचवर यहूदी धर्माच्या लोकांचा उत्सव सुरू होता. यावेळी ५० वर्षीय साजिद अकरम आणि २४ वर्षीय मुलगा नवीद अकरम यांनी सागरी किनाऱ्यावर उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर बेछूट गोळीबार केला. हे दोघेही पाकिस्तानी नागरिक असल्याचं असल्याचं समोर आले आहे.
न्यू साऊथ वेल्स पोलीस आयुक्त मैल लैन्योन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ५० वर्षीय दहशतवाद्याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे तर २४ वर्षीय दहशतवादी नवीद याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हे दोघांमध्ये वडील मुलाचे नाते आहे. दहशतवादी नवीद अकरम याच्याजवळ ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील ड्रायव्हिंग लायसेंसही होते. या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा दहशतवादी हल्ला घडवणारे साजिद आणि नवीद अकरम यांनी घरातून बाहेर निघताना दक्षिणी सागरी किनाऱ्यावर मासे पकडायला चाललोय असं सांगितले. त्यानंतर या दोघांनी लोकांवर गोळीबार केला.
दहशतवादी नवीदची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर पोलिसांनी सिडनी येथील त्याच्या घराला घेराव घातला होता. यावेळी मीडियाशी बोलताना नवीदची आई म्हणाली की, माझा मुलगा बेरोजगार होता. रविवारी त्याने कुटुंबाशी शेवटचं बोलणे केले. विकेंडला तो वडिलांसह बाहेर जात असल्याचे सांगितले. तपासात पोलिसांना घटनास्थळावरून संशयित ६ हत्यारे सापडली. साजिदजवळ १० वर्षाचा बंदूक परवाना होता. त्याशिवाय संशयितांच्या कारमध्ये आईडी आणि ISIS चा झेंडाही सापडला आहे. साजिद अकरम हा गन क्लबचा मेंबर होता. राज्यातील कायद्यानुसार त्याच्याकडे फायर आर्म्स लायसेन्स ठेवण्याचा अधिकार होता. या हल्ल्यामागची कारणे शोधली जात आहे. असंही पोलिसांनी सांगितले.
🚨🇦🇺#BREAKING | NEWS ⚠️
— Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) December 14, 2025
Watch as a civilian disarms one of the terrorist after a short struggle near the Bondi Beach in Sydney Australia this was a terrorist attack. There were two shooters. No word yet if they have both of the suspect shooters. pic.twitter.com/6bV3vGv8cz
दरम्यान, सिडनीतील बाँडी बीचवर १ हजाराहून अधिक लोक जमले होते. त्यावेळी जाणुनबुजून बंदूकधाऱ्यांनी यहूदी समुदायाला टार्गेट केले असं पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी म्हटलं. माझ्या मुलाकडे कुठलेही हत्यार नव्हते. तो बाहेरही जात नव्हता. मित्रांना भेटत नव्हता. केवळ कामाशी मतलब ठेवायचा असं नवीदच्या आईने सांगितले. त्याशिवाय कॅब्रामेटा हायस्कूलमध्ये त्याचे काही मित्र होते परंतु तो जास्त त्यांच्यात मिसळत नव्हता असंही आई म्हणाली. परंतु २०२२ मध्ये अकरमला एका सोशल मीडियात टॅग केले होते. त्यात नवीदने अल मुराद इन्स्टिट्यूटमध्ये कुराणचं शिक्षण पूर्ण केल्याचं दिसून आले. हे इन्स्टिट्यूट हेकेनबर्ग पश्चिमेकडे सिडनीत अरबी आणि कुराणचं शिक्षण देते. आता ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे.