Nepal Protest: नेपाळमध्ये दोन दिवसांपासून तरुणांचे हिंसक आंदोलन सुरू आहे. सरकारचा भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे या आंदोलनाला सुरुवात झाली. काठमांडुतून सुरू झालेले आंदोलन देशभर पसरले. यादरम्यान, आजी-माजी पंतप्रधानांसह राष्ट्रपतींच्या घरात जाळपोळ करण्यात आली. आता या हिंसक आंदोलनातून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी खनाल यांचे हत्या झाली आहे. संतप्त आंदोलकांनी खनाल यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला होता.
काठमांडूमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, निदर्शकांनी झलनाथ खनाल यांच्या निवासस्थानी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी घराची तोडफोड केली आणि आगही लावली होती. यादरम्यान, काही निदर्शकांनी खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना बेदम मारहाण केली होती, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त आंदोलकांनी केपी शर्मा ओली यांच्यासह नेपाळचे राष्ट्रपती आणि इतर अनेक मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. याशिवाय, माजी पंतप्रधानांच्या घरावरही हल्ले झाले. अनेकांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आळा. देशाच्या विद्यमान उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना तर रस्त्यात पळवून मारहाण झाली. आंदोलकांनी देशाची संसद आणि राष्ट्रपती भवनालाही आग लागली. या सर्व आंदोलनात देशाची मोठी वित्तहानी झाली आहे.
अनेक मंत्री देश सोडून पळालेया सर्व निदर्शनादरम्यान, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हेलिकॉप्टरची गर्दी पाहायला मिळाली. केपी शर्मा ओली, त्यांचे मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर अनेक नेत्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे.ओली दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भैसेपती येथील नेपाळ सरकारच्या मंत्र्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांमधून त्रिभुवन विमानतळासाठी सुमारे एक डझन हेलिकॉप्टर रवाना झाले. मात्र, नेत्यांना पळून जाण्यासाठी हेलिकॉप्टर पुरवल्याच्या आरोपाखाली निदर्शकांनी सिम्रिक एअरलाइन्सच्या इमारतीलाही आग लावली.
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
सध्या विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेपाळ लष्कराने मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. नवीन पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतरच आंदोलकांचा राग शांत होण्याची शक्यता आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पंतप्रधान करण्याची मागणी आंदोलक तरुण करत आहेत. या शर्यतीत त्यांचेच नाव सर्वात पुढे असल्यामुळे, लवकरच नावाची घोषणा होऊ शकते.