Nepal Plane Crash Video: नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील 5 मित्रांचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 21:11 IST2023-01-15T21:10:24+5:302023-01-15T21:11:19+5:30
Nepal Plane Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं...पाच भारतीय तरुणांपैरी एकाने अपघातापूर्वी विमानातून व्हिडिओ शूट केला. यावेळी विमानात भीषण आग लागल्याचे दिसत आहे.

Nepal Plane Crash Video: नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील 5 मित्रांचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
गाझीपूर-नेपाळमध्ये रविवारी एक दुःखद घटना घडली. एका प्रवासी विमानाचाअपघात होऊन 68 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असून ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी होते. विशाल शर्मा, सोनू जैस्वाल, संजय जैस्वाल, अभिषेक कुशवाह आणि अनिल राजभर अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण 13 जानेवारीला नेपाळ पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी एकाने अपघातापूर्वीविमानाच्या आतून व्हिडिओ शूट केला.
विमानात एकूण 72 लोक होते
नेपाळमध्ये रविवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांपैकी चार जण पोखरा पर्यटन केंद्रात पॅराग्लायडिंग उपक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. एका स्थानिक नागरिकाने ही माहिती दिली. मध्य नेपाळमधील पोखरा शहरात नव्याने सुरू झालेल्या विमानतळावर रविवारी सकाळी यती एअरलाइनचे विमान नदीच्या दरीत कोसळले. विमानात पाच भारतीयांसह 72 जण होते. या अपघातात विमानातील 68 जणांचा मृत्यू झाला.
The unfortunate video recording
— Akash Singh (@akki_gp) January 15, 2023
#NepalPlaneCrashpic.twitter.com/gJ8Ix56wiV
पोखरात पॅराग्लायडिंगचं नियोजन होतं!
यती एअरलाईनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातग्रस्त विमानात बसलेल्या पाच भारतीयांची नावे अभिषेक कुशवाह (25), विशाल शर्मा (22), अनिल कुमार राजभर (27), सोनू जैस्वाल (35) आणि संजय जैस्वाल (35). यापैकी सोनू जयस्वाल हा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी होता. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते. दक्षिण नेपाळमधील सरलाही जिल्ह्यातील रहिवासी अजय कुमार शाह म्हणाले की, विमानात बसलेले चार भारतीय पोखरा शहरात पॅराग्लायडिंग करण्यासाठी जात होते.
एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केला
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट केले की, “नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. आम्ही पीडित कुटुंबांसोबत आहोत. तर, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही नेपाळमधील विमान अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि ही 'अत्यंत दुर्दैवी' घटना असल्याचे म्हटले.