नेपाळमध्ये मोठी बस दुर्घटना, 11 प्रवाशांचा मृत्यू, 25 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:27 IST2019-10-11T16:24:57+5:302019-10-11T16:27:04+5:30
नेपाळमधल्या सिंधुपालचौक जिल्ह्यात एक बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे.

नेपाळमध्ये मोठी बस दुर्घटना, 11 प्रवाशांचा मृत्यू, 25 जण जखमी
नेपाळमधल्या सिंधुपालचौक जिल्ह्यात एक बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे, या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलंबू येथून बस भोट सियावरून काठमांडूला जात होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटी झाली. या अपघातात 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 30हून अधिक प्रवासी जखमी आहेत. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. डीएसपी माधव यांच्या माहितीनुसार, मृत आणि जखमींची संख्या अद्याप वाढलेली नाही. बचावकार्य सुरक्षा कर्मचारी राबवत आहेत. रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू आहे.