शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आर्मस्ट्राँगने चंद्रावरून आणलेल्या मातीसाठी नासावर खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 13:25 IST

लॉरा मरे यांना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या आईने सिनसिनाटी या शहरात राहात असताना एक मातीने भरलेली काचेची कुपी आणि एक पत्र दिले होते.

वॉशिंग्टन- परग्रहावरील वस्तू, माती, दगड कोणतेही अवशेष कोणत्याही नागरिकाच्या ताब्यात असल्यास अमेरिकन अंतराळविज्ञान संस्था नासा ते आपल्या ताब्यात घेते. मात्र चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगने आणलेल्या मातीमुळे नवे प्रकरण कोर्टात उभे राहाणार आहे.लॉरा मरे यांना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या आईने सिनसिनाटी या शहरात राहात असताना एक मातीने भरलेली काचेची कुपी आणि एक पत्र दिले होते. या पत्रावर एका ओळीत टू लॉरा अॅन मरे- बेस्ट ऑफ लक- नील आर्मस्ट्राँग अपोलो 11 असे लिहिले होते. त्यानंतर अनेक दशके लॉरा यांनी हे पत्र व कुपी पाहिलीच नव्हती. पाच वर्षांपुर्वी त्यांचे आई-वडिल वारल्यावर त्यांच्या वस्तू पाहाताना लॉरा यांना ही कुपी व पत्र मिळाले. ही कुपी मिळताच अपल्याला अत्यंत आनंद झाला आणि आपण धावतपळत येऊन ही कुपी व पत्र माझ्या पतीला दाखवले असे लॉरा सांगतात.

 

ही कुपी व पत्र आपल्याकडेच राहावे यासाठी नासावर खटला भरला आहे. नासाने अजून या कुपीवर आपला हक्क दाखवलेला नाही मात्र आजवर अशा वस्तू जप्त करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. नील आर्मस्ट्राँगने हे माझ्या बाबांचे मित्र होते. ते दोघेही अमेरिकेच्या हवाई दलामध्ये वैमानिक होते. तसेच त्या दोघांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सेवा बजावली होती. माझे बाबा व नील यांनी राजकीय व्यक्ती तसेच अनेक मोठ्या उच्चपदस्थांसाठी वैमानिकाचे काम गेले व क्वाएट बर्डमेन नावाच्या वैमानिकांच्या गुप्त गटाचे ते सदस्य होते. नील यांनी मला ही कुपी व पत्र भेट म्हणून दिले होते. ते सिनसिनाटीच्या विद्यापिठात एअरोस्पेस इंजिनियरिंगचे प्राध्यापक होते तेव्हा त्यांनी ही कुपी मला भेट दिली होती.चंद्रावरील माती किंवा धूळ जप्त करण्याच कोणताही कायदा नाही त्यामुळे ती कुपी बाळगण्यात काहीच अयोग्य नाही असे लॉरा यांचे वकिल ख्रिस्तोफर मॅकॉ यांनी स्पष्ट केले आहे. यामातीचे परीक्षण केल्यावर एका परिक्षणात ही माती चंद्रावरची असू शकते असा अहवाल आला तर दुसऱ्यामध्ये ही माती पृथ्वीवरची असल्याचा अहवाल आला तर काही तज्ज्ञांच्या मते यामध्ये या मातीत पृथ्वीवरची मातीही मिसळली गेली असावी.

टॅग्स :NASAनासाUSअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेNeil Armstrongनील आर्मस्ट्राँग