शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

निसर्ग पर्यटन हा आराेग्यदायी जीवनाचा मंत्र, नावेदा वेलनेसतर्फे आयाेजित वेबिनारमध्ये विजय दर्डा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 4:55 AM

Vijay Darda : प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित विजय दर्डा यांनी आयुष्य बदलणारे वेबिनार असल्याची भावना व्यक्त केली.

- आशीष दुबे

हाँगकाँग : निसर्गात पर्यटन करणे ही आराेग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. चांगली झाेप आणि मनमाेकळे हास्य हेसुद्धा सुदृढ आराेग्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भावना लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. नावेदा वेलनेस ग्रुपचे संचालक लाल दर्यानानी यांचा १५ एप्रिल राेजी वाढदिवस आहे. यानिमित्त जानेवारीपासून सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत गुरुवारी ‘८० ही नवीन ५० आहे’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. जगातील ५० पेक्षा अधिक देशांमध्ये ते प्रसारित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित विजय दर्डा यांनी आयुष्य बदलणारे वेबिनार असल्याची भावना व्यक्त केली. नैसर्गिक उपचार, आयुर्वेद आणि याेग मनाला शुद्ध करतात. तुम्ही अंतर्मनातून शुद्ध असाल तर चेहऱ्यावर त्याचे तेज जाणवते. लाल दर्यानानी हे खरे भारतीय, जिंदादिल व्यक्ती आणि विश्वासू मित्र असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लाल दर्यानानी यांनी आभार मानले. वेबिनारमध्ये एकता इंटरनॅशनल कं. लि. तायवानचे सीईओ दिलीप अमरनानी, मलेशिया टाॅवर असाेसिएशनचे  अध्यक्ष रवींद्र सिंह, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट व मॅराथनर हाँगकाँगचे दर्शन पारेख व चिल्ड्रेन्स टीव्ही कार्यक्रमाचे निवेदक एचकेजी हॅरी वाँग प्रामुख्याने उपस्थित हाेते.  नावेदा वेलनेसच्या सीईओ वीणा दनसिंघानी यांनी सांगितले, नावेदा हे हाॅँगकाँगमधील पहिले एकिकृत वेलनेस सेंटर आहे, ज्यामध्ये प्राचीन हिंदू वैदिक मंत्र, आधुनिक व विज्ञान आधारित प्राकृतिक उपचार पद्धतीसह संयाेजित करून भारतीय उत्पादन व सेवा देण्याचे व प्रसारित करण्याचे काम करीत आहे.   (सर्व १२ विशेष सत्र आणि सूचनात्मक वेबिनार नावेदाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत.)

१९९१ मध्ये हाँगकाँग विद्यापीठात आयुर्वेदाबाबत घरगुती उपचार पद्धतीला औषध म्हणून वैज्ञानिक मान्यता मिळवून देण्यासाठी संशाेधन करण्यात आले.  -डॉ. संजय नगरकर, वैज्ञानिक, इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग ॲण्ड डेव्हलपमेंट, हाँगकाँग

पूर्वेची संस्कृती अधिकाधिक प्रमाणात पश्चिमेकडे जात आहे. लाेकांनी आयुष्याकडे समग्र दृष्टीने पाहावे, असे लक्ष्य निर्धारित करावे. -अलीशा अली, निदेशक, युनिक यू करिअर, ब्रुसेल्स

ब्रह्मांड, पृथ्वी, सूर्य, हवा, पाणी आणि अग्नी यांचा वयाशी संबंध जाेडता येत नाही. कमी जगलाे तरी चालेल पण अधिकाधिक निर्मिती करून जगाला द्या.  -जगदीश ब्रमता, संस्थापक, जीवा बॅलेंस इंडिया

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाonlineऑनलाइन