शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 09:39 IST

Hassan Nasrallah Killed: इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे.

इस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या भागिदारीने इराण संतापला आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे.

इराणने म्हटले आहे की, या हल्ल्यात इस्रायलने अमेरिकेने दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. मात्र, आपल्याला या हल्ल्यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हती, असे अमेरिकेने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाह ही एक दहशतवादी संघटना असून तिला इराणचे समर्थन आहे.

हिजबुल्लाहचा कमांडर आणि नसरल्लाहची मुलगीही ठार - IDF ने शनिवारी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याची माहिती दिली होती. तसेच, एक्सवर पोस्ट करत, 'आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत', असे म्हटले आहे. हसन नसरल्ला 32 वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. ज्यांत नसरल्लाह लपलेला होता. या हल्ल्यात नसरल्लाह शिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलही मारला गेला. महत्वाचे म्हणजे, नसरल्लाहची मुलगी जैनब नसरल्लाहदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.

अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा -हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाच्या मृत्यूवर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रपती ज्यो बायडेन यानी नसरल्लाहचा मृत्यू "एका न्यायाचे माप" असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, अमेरिकेने इस्रायलकडून इराण समर्थित वेग-वेगळ्या दहशतवादी संघटनांविरोधात करण्यात येत असलेल्या हल्ल्यांना समर्थन असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलAmericaअमेरिकाIranइराणwarयुद्धTerrorismदहशतवाद