शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

NASA चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! 2030 पर्यंत चंद्रावर वीज निर्मिती; जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:49 IST

सौरऊर्जेपलीकडे एक पाऊल; भविष्यातील मानवी वसाहती आणि अंतराळ प्रवासासाठी मैलाचा दगड!

NASA New Mission: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) चंद्रावर अणुऊर्जा रिऍक्टर उभारण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या (Department of Energy) सहकार्याने राबवला जाणार असून, आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत दीर्घकालीन अंतराळ मोहिमा आणि भविष्यातील मंगळ ग्रहावरील प्रवास लक्षात घेऊन आखण्यात आला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत अणुऊर्जा रिऍक्टरच्या माध्यमातून चंद्रावर वीज निर्मिती केली जाणार आहे. नासाचा दावा आहे की, हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण केला जाईल आणि अनेक वर्षे सुरक्षित व स्थिर ऊर्जा पुरवठा करू शकेल. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी या प्रकल्पाला “अंतराळ संशोधनातील सुवर्णयुगाची सुरुवात” असे संबोधले आहे.

न्यूक्लियर रिऍक्टर म्हणजे काय?

न्यूक्लियर रिऍक्टर एक तंत्रज्ञानाधारित प्रणाली आहे, ज्यामध्ये नाभिकीय विखंडन (Nuclear Fission) प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती केली जाते. यामध्ये इंधन म्हणून युरेनियम-235 किंवा प्लुटोनियम-239 चा वापर होतो. अणूचे विखंडन झाल्यावर प्रचंड उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेतून टर्बाइन फिरवले जातात आणि त्यातून वीज तयार होते. चंद्रावर उभारला जाणारा हा रिऍक्टर अंतराळातील संशोधनासाठी एक मोठे पाऊल ठरणार असून, वीज उपलब्धतेची मर्यादा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विविध वैज्ञानिक प्रयोग अधिक सुलभपणे करता येतील.

चंद्राला अणुऊर्जेची गरज का?

चंद्रावर रात्रीचा कालावधी सुमारे दोन आठवड्यांचा असतो. या काळात सूर्यप्रकाश नसल्याने सोलर पॅनल्स प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे केवळ सौरऊर्जेवर अवलंबून राहणे कठीण होते. अणुऊर्जा रिऍक्टरच्या मदतीने वेळ, हवामान किंवा प्रकाशाच्या उपलब्धतेवर अवलंबून न राहता सतत वीजपुरवठा शक्य होणार आहे.

नवे तंत्रज्ञान, अधिक शक्तिशाली यंत्रणा

याआधीच्या काही अंतराळ मोहिमांमध्ये रेडिओआइसोटोप पॉवर सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. मात्र, नासाचा हा नवा रिऍक्टर अधिक मोठा आणि मजबूत असणार आहे. या प्रकल्पातून 40 किलोवॉटपर्यंत वीज निर्मिती होऊ शकते, जी पृथ्वीवर सुमारे 30 घरांना वीजपुरवठा करण्याइतकी आहे. हा रिऍक्टर चंद्राच्या कठीण वातावरणात किमान 10 वर्षे कार्यरत राहील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली हलकी, सुरक्षित असून रोबोट्स किंवा अंतराळवीरांद्वारे सहजपणे स्थापित करता येणार आहे.

या प्रकल्पाचा काय होणार परिणाम?

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास चंद्रावर सतत वीजपुरवठा शक्य होईल, मंगळ मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी सुलभ होईल आणि अंतराळातील ऊर्जा पुरवठ्याचा वेळ आणि खर्च कमी होईल. हा उपक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या धोरणाशीही सुसंगत मानला जात आहे, ज्यामध्ये त्यांनी अमेरिका अंतराळ संशोधनात आघाडीवर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

अणुऊर्जेचे फायदे काय?

कमी प्रमाणातील युरेनियममधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते, कोळसा व तेलापेक्षा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम असते. तसेच, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन न झाल्याने पर्यावरणपूरकदेखील आहे. एकूणच, चंद्रावर अणुऊर्जा रिऍक्टर उभारण्याचा नासाचा हा प्रकल्प केवळ अंतराळ संशोधनापुरता मर्यादित न राहता, भविष्यातील मानवी वसाहती आणि आंतरग्रहीय प्रवासासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NASA Plans Moon Nuclear Reactor for Power by 2030

Web Summary : NASA, in collaboration with the Department of Energy, aims to build a nuclear reactor on the moon by 2030. This project will provide a stable power source for lunar missions and future Mars expeditions, utilizing nuclear fission for efficient energy generation, independent of sunlight.
टॅग्स :NASAनासा