NASA Mars Mission: 'बिंदी' चमकली; मंगळावर यान उतरताच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या डॉ. स्वाती मोहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:13 PM2021-02-20T19:13:21+5:302021-02-20T19:14:57+5:30

Dr. Swati Mohan's bindi Photo Viral: शुक्रवारी नासाच्या या यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आणि एक आवाज आला 'टचडाउन कन्फर्म्ड', कोणत्याही मोठ्या मिशनच्या यशासाठी हे शब्द खूप मोलाचे असतात. तो आवाज होता डॉ. स्वाती यांचा. (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission)

NASA Mars Mission: spacecraft landed Dr. Swati Mohan's bindi Photo Viral on Social media | NASA Mars Mission: 'बिंदी' चमकली; मंगळावर यान उतरताच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या डॉ. स्वाती मोहन

NASA Mars Mission: 'बिंदी' चमकली; मंगळावर यान उतरताच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या डॉ. स्वाती मोहन

Next

जगभरात सध्या भारतीयांचा डंका सुरु आहे. अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष ही भारतीय महिला, गुगलचे सीईओ भारतीय अशा मोठमोठ्या पदांवर भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. आता तर पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी एक मूळच्या भारतीय महिलेने मंगळावर आपला आवाज पोहोचविला आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या वैज्ञानिक डॉ. स्वाती मोहन (Dr Swati Mohan) यांची सध्याच्या घडीला जगभरात चर्चा होत आहे. स्वाती यांनी भारतीय संस्कृतीचेही नाव जगभरातच नाही तर मंगळावरही कोरले आहे. (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission Dr Swati Mohan)


 मंगळावर जीवन असण्याची शक्यता वाटत असल्याने अमेरिका, चीनसह भारतही मंगळावर मोहिम केली आहे. या साऱ्या देशांनी यान पाठविली आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे पर्सवियरेन्स रोवर मिशन (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission) ला मंगळावरील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक मिशन म्हटले जात आहे. 


नासाच्या यानाला मंगळ ग्रहावर लँड करण्यात अनिवासी भारतीय असलेल्या अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांची भूमिका खूप महत्वाची ठरली आहे. शुक्रवारी नासाच्या या यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आणि एक आवाज आला 'टचडाउन कन्फर्म्ड', कोणत्याही मोठ्या मिशनच्या यशासाठी हे शब्द खूप मोलाचे असतात. तो आवाज होता डॉ. स्वाती यांचा. 


यानंतर लगेचच नासाने ट्विटरवर मिशनसंबंधीचे फोटो पोस्ट केले. यामध्ये एक फोटो डॉ. स्वाती यांचा देखील होता. त्या नासाच्या कंट्रोल रुममध्येच काम करत होत्या. पण हा फोटो यानाच्या वेगाने सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला. भारतीय ट्विटरातींनी त्यांना एकदम उचलून धरले, ते म्हणजे त्या एवढ्या मोठ्या पदावर असून, एवढी ख्याती कमावली असूनही अमेरिकेच्या नासामध्ये कपाळी टिकली लावून काम करतात. बास्, हीच बाब भारतीयांना भावली आणि त्यांच्या कर्तुत्वासोबतच भारतीय संस्कृतीचे नाव मंगळावर कोरल्याच्या आनंदात स्वाती यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षावही होऊ लागला. 

कोण आहेत स्वाती मोहन?
स्वाती मोहन या एक वर्षाच्या असताना त्यांचे आई वडील अमेरिकेला स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण Northern Virginia आणि Washington DC मध्ये झाले. त्यांनी कॉर्नेल विश्वविद्यालय आणि नंतर मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून अंतराळ विज्ञानावर शिक्षण घेतले आहे. Star Trek हा टीव्ही शो त्यांनी 9 व्या वर्षी पाहिला होता, तेव्हापासून त्यांना अंतराळ क्षेत्र खुणावू लागले होते. त्यांनी मार्स 2020 मोहिमेचे दिशा-निर्देशन आणि नियंत्रण विभागाचे नेतृत्व केले. रोव्हरला उतरविण्यासाठी त्यांनी फ्लाईट कंट्रोलरची भूमिका निभावली, जी यान सुखरुपपणे जमिनीवर उतरवण्यासाठी जोखमीची असते. 
 

Web Title: NASA Mars Mission: spacecraft landed Dr. Swati Mohan's bindi Photo Viral on Social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.