टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:52 AM2020-06-29T10:52:42+5:302020-06-29T11:05:43+5:30

अंतराळातील वेगवेगळ्या समस्यांपैकी अशीच एक समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिलंय, हे चॅलेंज पूर्ण करणारी व्यक्ती लाखो रूपये कमावू शकते.

NASA launches lunar loo challenge for toilet design, best design will win rs 26 lakh | टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी!

टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी!

googlenewsNext

आज टेक्नॉलॉजीमुळे वैज्ञानिकांना अंतराळात पाठवणं तसं फार कठिण काम राहिलेलं नाहीये. पण यात अडचणी कमी नसतात हेही तितकंच खरं. वैज्ञानिक सतत अंतराळ प्रवासातील अडथळे दूर करण्यावर काम करत असतात. नवनवीन उपाय शोधत असतात. अंतराळातील वेगवेगळ्या समस्यांपैकी अशीच एक समस्या सोडवण्यासाठी नासाने लोकांना एक चॅलेंज दिलंय, हे चॅलेंज पूर्ण करणारी व्यक्ती लाखो रूपये कमावू शकते.

अ‍ॅस्ट्रोनॉट अर्थातच फार बुद्धीमान आणि बहादूर असतात. पण अंतराळातही त्यांच्या गरज सामान्य मनुष्यांप्रमाणेच असतात. अंतराळात त्यांनाही टॉयलेट जाण्याची गरज असते. आता नासाला त्यांच्या अंतराळवीरांसाठी बाथरूमसंबंधी समस्येचं समाधान हवं आहे. 1975 मध्ये जेव्हा अपोलो मिशन संपलं तेव्हा इंजिनिअर्सनी मलमूत्र विसर्जनाला अंतराळ प्रवासादरम्यान एक गंभीर समस्या असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर नासाने काही उपकरण तयार तर केलेत पण समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही.

नासाने मदतीचा घेतला निर्णय

नासाने या समस्येचं समाधान शोधण्यासाठी यात सर्वसामान्य लोकांनाही समावून घेण्याचा निर्णय घेतलाय. नासाला असं वाटत की, लोकांनी त्यांच्या अंतराळवीरांसाठी मायक्रोग्रॅव्हिटी आणि चंद्रासारख्या कमी गुरूत्वाकर्षण ठिकाणांवर काम करणारं टॉयलेट डिझाइन करून त्यांना पाठवावं.

किती मिळणार बक्षीस

या कामासाठी नासाने 26 लाख रूपयांचं बक्षीस ठेवलं आहे. नासाने आता पुन्हा चंद्रावर जाण्याची तयारी सुरू केली आहे आणि तिथे वैज्ञानिकांना जास्त काळ राहता यावं याचीही तयारी नासा करत आहे. असे सांगितले जात आहे की, नासा चंद्रावर एक बेस कॅम्प तयार करणार आहे जिथे लोक जास्त काळ राहू शकतील. यात राहण्याची खास जागा, उपकरण आणि इतर आवश्यक सुविधा विकसित करणे यांचा समावेश असेल.

नासाने या चॅलेंजला 'लूनार लू चॅलेंज' असं नाव दिलं आहे. नासाकडून सांगण्यात आले आहे की, 'स्पेस टॉयलेट्स आधीच आहेत आणि ते वापरलेही जात आहेत. पण ते केवळ मायक्रोग्रॅव्हिटीसाठी डिझाइन केले आहेत'. हे डिझाइन पूर्ण करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट आहे.

नासाची योजना

नासाचं आर्टिमिस मून मिशन एक महिला आणि एका पुरूषाला चंद्रावर उतरवण्याचं काम 2024 पर्यत करेल. आर्टिमिस कार्यक्रमात चंद्राच्या प्रवासाचा अनुभव मंगळ प्रवासासाठी उपयोगात आणला जाणार आहे. यासाठी नासा ह्यूमन लॅंडिंग सिस्टीम प्रोग्राम तयार करत आहे. 

...म्हणून स्टारबक्सच्या कर्मचाऱ्याला २४ लाखांची टीप; उत्तम कामगिरीचं कौतुक

पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

Web Title: NASA launches lunar loo challenge for toilet design, best design will win rs 26 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.