CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 05:38 PM2020-06-28T17:38:44+5:302020-06-28T17:45:06+5:30

चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे.

uzbekistan government will pay usd 3000 if infected with corona virus during trip | CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

Next

ताशकंद - कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. सध्या अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे काही देशांतील परिस्थिती गंभीर झाली आहे. याच दरम्यान विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एका देशाने स्पेशल ऑफर दिली आहे. 

कोरोनाच्या संकटात उज्बेकिस्तानने पर्यटकांना जर कोरोना झाला तर तब्बल 3,000 डॉलर म्हणजेच दोन लाख देण्याची घोषणा केली आहे. उज्बेकिस्तान सरकारने आपल्या देशात जर कोणत्याही परदेशी पर्यटकाला  कोरोना व्हायरसची लागण झाली तर जवळपास 2 लाख 26 हजार रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. या देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. त्यानंतर आता पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

उज्बेकिस्तानमध्ये सुरक्षित यात्रा गॅरंटी हे अभियान सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार कोणताही पर्यटक आजारी पडला तर त्याचा आरोग्य खर्चही उचणार आहे. उज्बेकिस्तानचे राष्ट्रपती शवकात मिर्जीयोयेव यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.  उज्बेकिस्तानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आरोग्याबाबत आश्वास्त केलं जातं आहे. देशात पर्यटन क्षेत्रात सुरक्षा आणि साफसफाईची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना विषाणू पसरला. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचे 1 कोटीहून अधिक रुग्ण असल्याची आकडेवारी www.worldometers.info संकेतस्थळानं दिली आहे. सध्या जगात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 82 हजार 613 इतकी आहे. आतापर्यंत 5 लाख 1 हजार 308 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या 54 लाख 58 हजार 523  इतकी आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे 13 लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये 57 हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा

Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट

CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी खास उल्लेख केलेली 'ती' व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

CoronaVirus News : पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा रंगला पण नवरदेवाच्या वडिलांना 6 लाखांचा दंड ठोठावला

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

Web Title: uzbekistan government will pay usd 3000 if infected with corona virus during trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.