Narendra Modi : "मलेशियातील असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली लोकांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:49 IST2026-02-07T16:47:50+5:302026-02-07T16:49:06+5:30

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं.

Narendra Modi malaysia kuala lumpur pm indian diaspora speech | Narendra Modi : "मलेशियातील असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली लोकांची मनं

Narendra Modi : "मलेशियातील असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली लोकांची मनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, मलेशियामध्येभारतासाठी प्रचंड प्रेम आणि सन्मान आहे. येथील हे स्वागत भारत नेहमीच लक्षात ठेवेल.

भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या वर्षी ASEAN समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मी मलेशियाला येऊ शकलो नव्हतो. परंतु मी माझ्या मित्राला वचन दिलं होतं की, मी लवकरच मलेशियाला येईन आणि दिलेल्या वचनानुसार मी आज येथे उपस्थित आहे. २०२६ मधील हा माझा पहिलाच परदेश दौरा आहे."

मोदी पुढे म्हणाले की, भारताप्रती मलेशियाचं प्रेम आज दिसून आलं आहे. मलेशियामध्ये भारतीय संगीत आणि सिनेमा अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मलेशियातील ५०० शाळांमध्ये भारतीय भाषांचं शिक्षण दिलं जात आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट झाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी नमूद केलं की, आज आपण प्रगतीच्या वाटेवर एकमेकांच्या सोबत आहोत. भारत आणि मलेशियाला एक सामायिक वारसा लाभला आहे. मलेशियामध्ये स्वामी विवेकानंद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी सांगितलं की, "मी माझ्या 'मन की बात' कार्यक्रमातही मलेशियाचा उल्लेख केला होता. आपण एकमेकांचे भागीदार देश आहोत आणि भारताचं यश हे मलेशियाचंही यश आहे." यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणाही केली की, 'यूपीआय' (UPI) लवकरच मलेशियामध्येही लाँच केले जाईल. 

Web Title : मलेशिया में भव्य स्वागत; कुआलालंपुर में मोदी ने जीता दिल

Web Summary : प्रधानमंत्री मोदी की मलेशिया यात्रा में भारत-मलेशिया के मजबूत रिश्ते दिखे। उन्होंने भारतीय समुदाय को संबोधित करते हुए आपसी सम्मान और साझा विरासत पर जोर दिया। उन्होंने भारतीय संस्कृति की लोकप्रियता बताई और मलेशिया में यूपीआई लॉन्च करने की घोषणा की, जो बढ़ती साझेदारी का प्रतीक है।

Web Title : Malaysia's warm welcome unforgettable; Modi wins hearts in Kuala Lumpur.

Web Summary : Prime Minister Modi's Malaysia visit highlighted strong India-Malaysia ties. He addressed the Indian diaspora, emphasizing mutual respect and shared heritage. He noted the popularity of Indian culture and announced UPI's upcoming launch in Malaysia, signifying growing partnership.