एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 21:49 IST2025-07-26T21:49:25+5:302025-07-26T21:49:48+5:30

Alien Spacecraft Will Attack Earth: एक रहस्यमय अंतराळ यान वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे, तसेच ते नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर हल्ला करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी एका नव्या अध्ययनामधून केला आहे.

Mysterious alien spacecraft will attack Earth in November, scientists make shocking claim | एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा

एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा

एलियन म्हणजे परग्रहवासींबाबत पृथ्वीवरील सर्वसामान्य मानवांसोबत अंतराळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही फार कुतूहल आहे. हे एलियन कसे असतील, त्यांची आणि मानवाची कधी भेट होईल का? समजा मानव आणि या परग्रहवासियांचा कधी आमना-सामना झाला तर ते पृथ्वीवर हल्ला करणार का? असे प्रश्न अनेकांना पडत असतात. दरम्यान, एक रहस्यमय अंतराळ यान वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे, तसेच ते नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर हल्ला करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी एका नव्या अध्ययनामधून केला आहे. हल्लीच एका इंटरस्टेलरचा शोध लागला असून. ती खूप वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्यामधून असे काही संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे हे एलियन्सचं अंतराळ यान असावं, अशी शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.  

या संदर्भात समोर आलेल्या संशोधनानुसार मॅनहॅटनच्या आकाराची एक रहस्यमय वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत आहे. तसेच ती एलियन्सचं अंतराळ यान असावं, असे संगण्यात येत आहे. हे अंतराळ यान या नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला शास्त्रज्ञांना एक दुर्मीळ इंटरस्टेलर ऑब्जेक्ट दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. ही आतापर्यंत पाहिली गेलेली तीसरी अशी वस्तू आहे जी आपल्या सौरमालेतून वेगाने जात आहे. २२ जुलै रोजी प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक प्रबंधामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. तसेच ३आय/अॅटलस नावाची ही वस्तू एक्स्ट्राटेरिटेरियल तंत्रज्ञान असू शकतं आणि ते आपल्या ग्रहावर हल्ला करण्यासाठी आलं असावं, असा दावा करण्यात येत आहे.

संशोधकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ३आय/अॅटलसची कक्षा अशी आहे की, ज्यामुळे कुठलंही एलियन्सचं यान नजरेच्या टप्प्यात न येता पृथ्वीपर्यंत आरामत पोहोचू शकतं. त्यामुळेच नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ते सूर्याच्या अगजी जवळ येईल तेव्हा ते पृथ्वीवरून दिसणार नाही. त्यामुळे आपली गती कमी करून सूर्यमालेमध्ये कायम राहण्यासाठी एक गुप्त वेगवान युद्ध सराव करू शकेल. तसेच गोपनीय पद्धतीने हल्ला करण्याची तयारी करू शकेल, असा दावा केला जात आहे.  

Web Title: Mysterious alien spacecraft will attack Earth in November, scientists make shocking claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.