या देशात ६ वर्षीय मुलीला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक, लष्करप्रमुखाच्या हत्येत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:55 IST2025-06-06T17:55:31+5:302025-06-06T17:55:56+5:30

या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Myanmar News a 6-year-old girl was arrested on terrorism charges, involved in the assassination of the army chief | या देशात ६ वर्षीय मुलीला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक, लष्करप्रमुखाच्या हत्येत सहभाग

या देशात ६ वर्षीय मुलीला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक, लष्करप्रमुखाच्या हत्येत सहभाग

म्यानमारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय मुलीला दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही मुलगी अलिकडेच एका निवृत्त लष्करी जनरलची हत्या करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. ही घटना म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये दिवसाढवळ्या घडली. या मुलीला दहशतवादी असल्याचा आरोप असलेल्या १५ इतर लोकांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी ६८ वर्षीय निवृत्त ब्रिगेडियर जनरल आणि माजी राजनयिक चो तुन आंग यांची यांगूनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या भररस्त्यात दिवसाढवळ्या झाली. म्यानमारच्या लष्कर समर्थित वृत्तपत्र ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमारनुसार, या प्रकरणात एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात या मुलीचा समावेश आहे. ही मुलगी हत्येतील मुख्य आरोपीची मुलगी आहे.

या संघटनेने हत्येची जबाबदारी घेतली 
गोल्डन व्हॅली वॉरियर्स नावाच्या बंडखोर संघटनेने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.  म्यानमार लष्कराने या गटाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.त्यांचा दावा आहे की, चो तुन आंग हे सतत लष्कराच्या दडपशाही कारवायांना, विशेषतः नागरिकांविरुद्ध, पाठिंबा देत होते. म्हणूनच त्यांना ठार मारण्यात आले.

म्यानमार सैन्याचा मोठा दावा 
या हत्येमागे देशाचे निर्वासित सरकार, राष्ट्रीय एकता सरकार (NUG) असल्याचा आरोपही लष्कराने केला आहे. मारेकऱ्याला सुमारे २००,००० क्याट (सुमारे ९५ अमेरिकन डॉलर्स) देण्यात आल्याचा दावा लष्कराने केला आहे. पण, NUG ने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 

सत्तापालटानंतर कथा बदलली
२०२१ च्या लष्करी सत्तापालटानंतर म्यानमारमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली आहे. सार्वत्रिक निवडणुकांद्वारे निवडून आलेले सरकार काढून लष्कराने सत्ता काबीज केली. यानंतर, देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निषेध करणाऱ्या सामान्य नागरिकांना, महिलांना आणि मुलांनाही तुरुंगात टाकले जात आहे. AAPP या स्वतंत्र संस्थेच्या मते, आतापर्यंत ६०० हून अधिक मुलांना अटक करण्यात आली आहे, तर सुमारे ६,७०० नागरिक मारले गेले आहेत.
 

Web Title: Myanmar News a 6-year-old girl was arrested on terrorism charges, involved in the assassination of the army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.