Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 07:04 PM2023-11-13T19:04:33+5:302023-11-13T19:06:05+5:30

Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Myanmar Airstrike: Airstrike from Myanmar near Indian border, high alert in Mizoram | Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात नेमके किती बंडखोर मारले गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. 

भारत आणि म्यानमार या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या बंडखोरांनी आपले अड्डे उभे केले आहेत. त्या अड्ड्यांनाच म्याानमारकडून आज लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही काळापासून म्यानमारमधील परिस्थिती बिघडत असून, तेथील लष्करी सत्तेला बंडखोर सातत्याने आव्हान देत आहेत. 

दरम्यान, रविवारी रात्रीपासून म्यानमारचं लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये भारताच्या सीमेलगत भीषण गोळीबार सुरू आहे. हा घटनेनंतर म्यानमारमधील शेकडो नागरिक सुरक्षित आसरा शोधण्यासाठी भारताच्या सीमेवर गोळा झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारमधील सैन्य आणि चीनलँड डिफेन्स फोर्स (सीडीएफ) च्या कॅडर्समध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. म्यानमारच्या लष्कराचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. 

चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासून गोळीबार सुरू आहे. तो रात्रभर सुरू होता. आज सकाळी हा गोळीबार थांबला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बॉम्ब टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामुळे भारतात कुठलंही नुकसान झालेलं नाही. संरक्षणविषयक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या दोन आठवड्यांमद्ये उत्तरी शान राज्यामध्ये लढा तीव्र झालेला आहे. 

म्यानमारमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, हिंसेनंतर म्यानमारच्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी भारताच्या सीमेमध्ये आश्रय घेतला आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारपासून म्यानमारचे किती नागरिक भारताच्या हद्दीत आले आहेत, याचा निश्चित आकडा आम्ही सांगू शकत नाही. हे चक्र गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. जेव्हा म्यानमारमध्ये हिंसेचा भडका उडतो तेव्हा तेथील नागरी इकडे आश्रयाचा येतात. त्यातील बहुतांश परत जातील तेव्हा परिस्थिती सामान्य होईल.  

Web Title: Myanmar Airstrike: Airstrike from Myanmar near Indian border, high alert in Mizoram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.