शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:07 PM

इम्रान खान यांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला

इस्लामाबाद: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्रांनीच खडे बोल सुनावले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तोंड सांभाळून बोला, अशा सूचना मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना केल्या आहेत. दोन देशांमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेतून सोडवा, असा सल्लादेखील मुस्लिम राष्ट्रांनी खान यांना दिला. अमेरिका, चीननंतर आता मुस्लिम राष्टांनीही पाकिस्तानच्या पाठिशी न राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींवर टीका केली. यावरुन मुस्लिम देशांनी खान यांचे कान उपटले आहेत. सौदी अरेबियाचे उप परराष्ट्रमंत्री अदेल अल-जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन अल-नह्यान ३ सप्टेंबरला इस्लामाबादमध्ये होते. त्यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या देशांच्या प्रमुखांच्या वतीनं देण्यात आलेला संदेश इम्रान खान यांच्यापर्यंत पोहोचवला. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा उपस्थित होते. अतिशय गुप्तपणे झालेल्या या बैठकीला परराष्ट्र मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील हजर होते. भारतासोबत झालेला तणाव निवळण्यासाठी चर्चा करा. राजदूतांच्या मदतीनं हा प्रश्न सोडवा, असा सल्ला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून इम्रान खान यांना देण्यात आला. आम्ही भारताला काश्मीरमधील काही निर्बंध हटवण्यास सांगू, असं आश्वासन सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलं. आम्ही यासंदर्भात भारताशी बोलू. मात्र त्याआधी इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका थांबवावी, तोंडाला आवर घालावा, अशा शब्दांमध्ये दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं. काश्मीरवरुन खान यांनी अनेकदा मोदींवर टीका केली असून थेट युद्धाची धमकीदेखील दिली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर