इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:33 IST2025-06-14T10:22:27+5:302025-06-14T10:33:12+5:30

"आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही."

Muslim country jordan became a shield for Israel, shot down an Iranian drone in its airspace; King is a descendant of Prophet Muhammad | इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज

इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज

इस्रायलनेइराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर, दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. मात्र इराणकडून करण्यात आलेले सर्वच्या सर्व ड्रोन हल्ले इस्रायल आणि जॉर्डनच्या सैन्याने यशस्वीपणे हाणून पाडले. इराणी ड्रोन हाणून पाडण्यासाठी जॉर्डनकडून इस्रायली सैन्याला विशेष मदत मिळत आहे. खरे तर, या भागात जॉर्डन हा इस्रायलचा खास सहकारी आहे आणि त्याला सातत्याने मदत करत असतो. गेल्या वर्षीही इस्रायलच्या दिशेने जाणारे मिसाइल्स आणि ड्रोन जॉर्डनने रोखले होते. मुस्लीम बाहुल्य जॉर्डनसंदर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह (जॉर्डन किंग अब्दुल्ला- II) यांना पैगंबर मोहम्मद यांचे वंशज मानले जाते.

जॉर्डनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या सैन्याने आज सकाळच्या सुमारास आपल्या हवाई हद्दीत प्रवेश केलेले अनेक मिसाइल्स रोखले. या मिसाइल आणि ड्रोनच्या सहाय्याने इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. मात्र जॉर्डनने ते हवेतच  हाणून पाडले. महत्वाचे म्हणजे, जॉर्डनने त्यांची हवाई सीमाही तात्पुरती बंद केली आहे. 

आमची हवाई हद्द म्हणजे, युद्धाचे मैदान नाही - 
यासंदर्भात भाष्य करताना जॉर्डन म्हणाला, आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही. इराण-इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच जॉर्डनचे हे विधान केले आहे. जॉर्डनच्या एका बाजूला इस्रायल आणि त्याने कब्जा केलेला वेस्ट बँक आहे. तर दुसऱ्या बाजूला इराणचा शेजारी इराक आहे. यामुळे इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणच्या दृष्टीने जॉर्डनची हवाई हद्द महत्वाची आहे.

खरे तर, जॉर्डनने १९९४ मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. असे करणारा तो दुसरा अरब देश बनला. तेव्हापासून जॉर्डनचे इस्रायलसोबत अत्यंत जवळचे गुप्तचर आणि सुरक्षा संबंध आहेत. जॉर्डन हा अमेरिकेचा विशेष मित्र देखील आहे. अशा परिस्थितीत, इराणी हल्ल्यांदरम्यान तो इस्रायलसाठी भिंत बनतो.

खरे तर, जॉर्डनने १९९४ मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला आहे. असे करणारा तो दुसरा अरब देश बनला. तेव्हापासून जॉर्डनचे इस्रायलसोबत अत्यंत जवळचे गुप्तचर आणि सुरक्षा संबंध आहेत. जॉर्डन हा अमेरिकेचा विशेष मित्र देखील आहे. अशा परिस्थितीत, इराणी हल्ल्यांदरम्यान तो इस्रायलसाठी भिंत बनून उभा राहतो आणि इस्रायलला उघडपणे मदत करतो.

Web Title: Muslim country jordan became a shield for Israel, shot down an Iranian drone in its airspace; King is a descendant of Prophet Muhammad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.