"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:52 IST2026-04-09T16:52:39+5:302026-04-09T16:52:56+5:30

पंतप्रधान शाहबाज मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले, "आज अल्लाहने पाकिस्तानला दिलेला हा सन्मान देशाच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण आहे."

Munir is our hero Shahbaz Sharif struggles to take credit for US-Iran ceasefire | "मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा

"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा

अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या १४ दिवसांच्या ऐतिहासिक युद्धविरामातपाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करत पंतप्रधान शहबाज शरीफ भलतेच खूश दिसत आहेत. "आज पाकिस्तान कायमचा बदलला असून जग आता आपल्याकडे आदराने पाहत आहे," अशा शब्दांत शरीफ यांनी स्वतःच्या सरकारची पाठ थोपटून घेतली आहे.

मुनीर आपले 'हिरो' -
मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना शरीफ यांनी फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे विशेष कौतुक केले. मुनीर यांनी राजकीय नेतृत्वाच्या खांद्याला खांदा लावून काम केले, ते केवळ युद्धाचेच नाही तर शांतता प्रक्रियेचेही 'हिरो' असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अटीवर या सीजफायरची घोषणा केली. दरम्यान, सीजफायर करवण्यासाठी त्यांनी पाकिस्तान, शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांचाही उल्लेख केला.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान शाहबाज मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले, "आज अल्लाहने पाकिस्तानला दिलेला हा सन्मान देशाच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण आहे. टोकियोपासून लंडन आणि क्वालालंपूरपर्यंत, टीव्ही चॅनल्सवर आणि संस्थांमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानचा उल्लेख होत आहे, ते अभूतपूर्व आहे. असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही."

१० एप्रिलला इस्लामाबादमध्ये निर्णायक बैठक -
पंतप्रधान शरीफ यांनी या यशाचे श्रेय पाकिस्तानच्या २४ कोटी जनतेला दिले आहे. टोक्योपासून लंडनपर्यंतच्या जागतिक संस्थांमध्ये पाकिस्तानची चर्चा होणे हा देशाच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. आता दोन्ही देशांचे प्रतिनिधी १० एप्रिल रोजी निर्णायक चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये एकत्र येणार असून, हा चर्चेचा पुढचा टप्पाही यशस्वी होईल, असा विश्वास शरीफ यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title : शहबाज शरीफ ने अमेरिका-ईरान युद्धविराम का श्रेय लिया, आसिम मुनीर की प्रशंसा की।

Web Summary : पाकिस्तानी प्रधानमंत्री शहबाज शरीफ ने अमेरिका-ईरान युद्धविराम कराने का श्रेय लेते हुए फील्ड मार्शल आसिम मुनीर की भूमिका की सराहना की। उन्होंने पाकिस्तान की वैश्विक स्थिति में वृद्धि और इस्लामाबाद में आगामी वार्ता को राष्ट्र के लिए जीत बताया।

Web Title : Shahbaz Sharif claims credit for US-Iran ceasefire, praises Asim Munir.

Web Summary : Pakistani PM Shahbaz Sharif is claiming credit for brokering the US-Iran ceasefire, praising Field Marshal Asim Munir's role. He highlighted Pakistan's enhanced global standing and the upcoming talks in Islamabad as a victory for the nation.