अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:22 IST2026-04-10T13:21:18+5:302026-04-10T13:22:29+5:30

MQ-4C Triton Drone Missing : हे ड्रोन इराणच्या किनारपट्टीजवळ गस्त घालत होते. यावेळी अचानक रडारवरून गायब झाले.

MQ-4C Triton Drone Missing : US military shocked! Hi-tech drone worth Rs 1800 crore goes missing from Hormuz; Iran says it shot it down... | अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...

अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...

अमेरिका आणि इराणमध्ये नुकताच १४ दिवसांचा युद्धविराम जाहीर झाला असला, तरी इराणच्या आखातातील परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि महागडे MQ-4C Triton हे पाळत ठेवणारे ड्रोन हॉर्मुझच्या आखातातून बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे अमेरिकन संरक्षण विभागात खळबळ उडाली असून, इराणने हे ड्रोन पाडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रोन इराणच्या किनारपट्टीजवळ गस्त घालत होते. यावेळी अचानक रडारवरून गायब झाले. युद्धविराम घोषित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही घटना घडल्याने शांतता चर्चेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. अमेरिकन नौदलाने अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा दिला नसला तरी, शोध मोहीम वेगाने सुरू केली आहे.

इराणची भूमिका संशयास्पद
यापूर्वी २०१९ मध्ये इराणने अमेरिकेचे 'ग्लोबल हॉक' ड्रोन याच भागात पाडले होते. ताज्या घटनेनंतर इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इराणच्या सरकारी माध्यमांनी "विदेशी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर इराणने हे ड्रोन पाडले असेल, तर सुरू झालेला युद्धविराम संकटात येऊ शकतो.

MQ-4C ट्रायटनची वैशिष्ट्ये
हे ड्रोन केवळ पाळत ठेवण्यासाठी नाही, तर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी जगातील सर्वात प्रगत यंत्रणांपैकी एक मानले जाते. याची किंमत सुमारे १८० दशलक्ष डॉलर्स इतकी असून, ते २४ तासांहून अधिक काळ ५०,००० फूट उंचीवर उडू शकते. अशा हाय-टेक ड्रोनचे बेपत्ता होणे हा अमेरिकेसाठी मोठा लष्करी आणि राजनैतिक धक्का मानला जात आहे.

Web Title : होर्मुज के पास अमेरिकी सैन्य ड्रोन गायब; ईरान पर संदेह

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य के पास एक अमेरिकी नौसेना MQ-4C ट्राइटन ड्रोन गायब हो गया, जिससे खलबली मच गई। ईरान पर संदेह है, जो 2019 की घटना की याद दिलाता है। 180 मिलियन डॉलर का हाई-टेक ड्रोन निगरानी कर रहा था। इस घटना से नाजुक अमेरिकी-ईरान शांति वार्ता खतरे में है, और खोज जारी है।

Web Title : US Military Drone Vanishes Near Hormuz; Iran Suspected in Disappearance

Web Summary : A US Navy MQ-4C Triton drone vanished near the Strait of Hormuz, sparking alarm. Iran is suspected, reminiscent of a 2019 incident. The high-tech drone, valued at $180 million, was conducting surveillance. The incident threatens fragile US-Iran peace talks, and a search is underway.