Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:11 IST2025-05-30T20:08:08+5:302025-05-30T20:11:18+5:30
रॅक्वेल स्मिथ या महिलेने आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलीला एका तांत्रिकाकडे काळ्या जादूसाठी विकल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं
आईसाठी आपलं मूल हे प्राणांहून प्रिय असतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेली एक अत्यंत भयावह आणि धक्कादायक घटना संपूर्ण जगाच्या मन हेलावून टाकणारी ठरली आहे. केपटाऊन येथे राहणाऱ्या रॅक्वेल स्मिथ या महिलेने आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलीला एका तांत्रिकाकडे काळ्या जादूसाठी विकल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात तिचा प्रियकर जॅक्वान अपोलिस आणि मित्र स्टीव्हानो व्हॅन रिन यांनाही दोषी ठरवत त्यांनाही जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.
देशभरात सहानुभूतीची लाट
ही घटना २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. स्मिथची मुलगी जोशलिन अचानक गायब झाली, तेव्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देश एकवटला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांना तिच्या आईबद्दल सहानुभूती वाटत होती. मात्र, पोलीस तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या प्रकरणाचे भयावह सत्य उघड होत गेले.
२०,००० रँडमध्ये विक्री आणि काळी जादू
तपासात समोर आले की, रॅक्वेल स्मिथने तिच्या मुलीला एका तांत्रिकाला अवघ्या २०,००० रँडमध्ये विकले होते. या तांत्रिकाने ० काळ्या जादूसाठी मुलीचे डोळे आणि त्वचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे केवळ ड्रग्जसाठी पैशांची गरज असल्याने आईने हे पाऊल उचलले होते. मुलीच्या शरीराचा वापर तांत्रिक विधीसाठी होणार होता, हे समजताच देशभरात संतापाची लाट उसळली.
न्यायालयाचा कठोर निर्णय
या खटल्याची सुनावणी जवळपास आठ आठवडे चालली. समाजातील वाढता प्रक्षोभ लक्षात घेता, न्यायालयीन प्रक्रिया इतकी महत्त्वाची ठरली की, लोकांना सहभागी होता यावे म्हणून ती एका स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली.
न्यायाधीश नॅथन इरास्मस यांनी आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले की, या गुन्ह्यातील आरोपींमध्ये कोणताही पश्चात्ताप दिसत नाही. त्यामुळे या क्रूर आणि अमानवी कृत्याबद्दल त्यांना सर्वात कठोर शिक्षा म्हणजेच जन्मठेप देणे आवश्यक आहे.