मोज्तबा खामेनेई सार्वजनिकरित्या समोर येईनात; इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे? जगभरात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:30 IST2026-03-23T11:29:19+5:302026-03-23T11:30:14+5:30

इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्या अस्तित्वाबाबत सध्या जगभरात संभ्रम निर्माण झाला आहे.

Mojtaba Khamenei will not appear in public; What is really going on in Iran? Confusion around the world | मोज्तबा खामेनेई सार्वजनिकरित्या समोर येईनात; इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे? जगभरात संभ्रम

मोज्तबा खामेनेई सार्वजनिकरित्या समोर येईनात; इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे? जगभरात संभ्रम

इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्या अस्तित्वाबाबत सध्या जगभरात संभ्रम निर्माण झाला आहे. वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोज्तबा यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली खरी, मात्र तेव्हापासून ते एकदाही सार्वजनिक रित्या समोर आलेले नाहीत. यामुळेच मोज्तबा खामेनेई नेमके कुठे आहेत? ते जिवंत आहेत की हल्ल्यात जखमी झाले आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

९ मार्चला घोषणा, पण दर्शन नाहीच

इराणने ९ मार्च रोजी मोज्तबा खामेनेई यांना अधिकृतपणे आपला नवा सर्वोच्च नेता घोषित केले होते. मात्र, कमान हाती घेतल्यापासून त्यांनी ना जनतेला संबोधित केले आहे, ना कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी त्यांची जाहीर भेट झाली आहे. इतकेच नाही तर, इराणच्या परंपरेनुसार नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च नेते जनतेला संबोधित करतात, तसे न करता मोज्तबा यांनी केवळ एक लिखित संदेश जारी केला. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या शंका अधिक गडद झाल्या आहेत.

CIA आणि मोसादची नजर, पण सुगावा लागेना

जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्था मानल्या जाणाऱ्या अमेरिकेची CIA आणि इस्रायलची मोसाद मोज्तबा यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. अमेरिकन सूत्रांच्या दाव्यानुसार, काही इराणी अधिकारी मोज्तबा यांना भेटण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ते जिवंत असावेत, असा अंदाज आहे. मात्र, ते स्वतः निर्णय घेण्याच्या स्थितीत आहेत का? याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने ही परिस्थिती अत्यंत विचित्र असल्याचे म्हटले आहे.

मोज्तबा समोर का येत नाहीत? तज्ज्ञांचे तर्क

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, मोज्तबा खामेनेई समोर न येण्यामागे खालील काही महत्त्वाची कारणे असू शकतात. इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या थेट युद्धामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका असू शकतो, म्हणून त्यांना गुप्त ठिकाणी ठेवले असावे. काही रिपोर्टनुसार, अलीकडच्या काळात झालेल्या हवाई हल्ल्यात मुज्तबा गंभीर जखमी झाले असावेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू असावेत. तर, युद्धाच्या काळात शत्रूला संभ्रमात टाकण्यासाठी इराणने हे 'सायलेंस' पाळले असण्याचीही शक्यता आहे.

जागतिक चिंतेत भर

मोज्तबा खामेनेई यांची अनुपस्थिती केवळ इराणसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर इराणचे नेतृत्व अस्थिर असेल, तर मिडल ईस्ट मधील युद्धाची दिशा काय असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मोज्तबा स्वतः समोर येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम देतात की हा सस्पेन्स असाच कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : ईरान के सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनेई लापता; दुनिया भर में अनिश्चितता।

Web Summary : मोज्तबा खामेनेई के लापता होने से दुनिया भर में अटकलें तेज हो गई हैं। मार्च में ईरान के नेता घोषित होने के बाद से वह सार्वजनिक रूप से सामने नहीं आए हैं, जिससे मध्य पूर्व तनाव के बीच उनकी सेहत और ईरानी नेतृत्व की स्थिरता को लेकर चिंता बढ़ गई है। सीआईए और मोसाद जांच कर रहे हैं।

Web Title : Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei Missing; Uncertainty Grips the World.

Web Summary : Mojtaba Khamenei's absence fuels global speculation after his father's death. Announced as Iran's leader in March, he hasn't appeared publicly, raising concerns about his health and stability of Iranian leadership amidst Middle East tensions. CIA and Mossad are investigating.