शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांच्या सीईओंसोबत मोदींची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:37 AM

भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा झाली. जागतिक ऊर्जा कंपन्यांचे १७ मुख्य कार्यकारी अधिकारी यात सहभागी झाले.

ह्युस्टन : अमेरिकेच्या एक आठवड्याच्या दौऱ्यावर दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील तेल व गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा झाली. जागतिक ऊर्जा कंपन्यांचे १७ मुख्य कार्यकारी अधिकारी यात सहभागी झाले. या कंपन्यांची उपस्थिती १५० देशांत आहे. या कंपन्यांचे एकूण मूल्य १००० अब्ज डॉलर आहे.मोदी यांनी टष्ट्वीट केले आहे की, ह्यूस्टनमध्ये येऊन ऊर्जा विषयावर चर्चा नाही, असे होणार नाही. ऊर्जा क्षेत्राच्या सीईओंसोबत चांगली चर्चा झाली. अमेरिकेतील नैसर्गिक गॅस कंपनी टेल्युरियन इंक आणि भारताच्या पेट्रोनेट एलएनजी कंपनीने एका करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, भारताची पेट्रोनेट एलएनजी कंपनी आणि तिच्या सहायक शाखा अमेरिकेतून दरवर्षी ५० लाख टन नैसर्गिक गॅस (एलएनजी) आयात करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी टष्ट्वीट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये ऊर्जा क्षेत्राच्या सीईओंसोबत एक यशस्वी चर्चा केली आहे. पीएमओनेही याबाबतची काही छायाचित्रे टिष्ट्वटरवर शेअर केली. मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेत सुधारणांसाठी करण्यात आलेल्या उपायांचे अमेरिकी कंपन्यांच्या अधिकाºयांनी स्वागत केले. ‘एअर प्रोडक्टस्’चे सीईओ सैफी घासमी यांनी म्हटले आहे की, आम्ही काही सूचना केल्या आणि पंतप्रधान मोदी यांनी त्या अतिशय काळजीपूर्वक ऐकल्या. बाकर ह्यूसेज, बीपी पीएलसी, इमर्सन इलेक्ट्रिक कंपनी आदी कंपन्यांचे सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी