This model becomes the only celebrity followed on twitter by Biden's official account | केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल?

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल?

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आले आहेत. या अकाउंटवरून बायडन यांनी आतापर्यंत एकूण केवळ १३ लोकांना फॉलो केलं आहे. या १३ लोकांमध्ये त्यांच्या पत्नी जिल बायडन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि काही सहकाऱ्यांसहीत सेलिब्रिट मॉडल क्रिसी टीगेनचाही समावेश आहे. टीगेनने स्वत: राष्ट्राध्यक्षांकडे तिला फॉलो करण्याची विनंती केली होती. ती विनंती बायडेन यांनी स्वीकारली आहे. 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या फॉलोइंग लिस्टमध्ये असणाऱ्या मॉडल क्रिसी टीगेनने स्वत: ट्विट करून त्यांना विनंती केली होती. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले होते की, 'हॅलो, जो बायडेन, गेल्या चार वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर मला ब्लॉक केलं होतं. काय तुम्ही मला फॉलो करू शकता'. मॉडल क्रिसी टीगेन ट्विटरवर बिनधास्त बोलण्यासाठी लोकप्रिय आहे. तिने ट्रम्पवर अनेकदा टीका केली होती. ज्यानंतर तिला ब्लॉक करण्यात आलं होतं.

३५ वर्षीय टीगेन जो बायडेन यांच्याकडून प्रभावित झाली आहे आणि तिला वाटतं की, बायडन यांच्या नेतृत्वात अमेरिका नव्या शिखरावर पोहोचेल. राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी वेळी टीगेन पती गायक जॉन लीजेंड आणि मुलांसोबत वॉशिंग्टन डीसीमध्ये होती. राष्ट्राध्यक्षांनीच तिला फॉलो केल्याने ती आनंदी आहे. 

जो बायडेन यांच्याकडून टीगेनची इच्छा पूर्ण करण्यात आल्यावर राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत अकाउंटवरून फॉलो करण्यात येणारी ती एकमेव सेलिब्रिटी बनली आहे. दरम्यान POTUS ट्विटर अकाउंट चे आतापर्यंत ५.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर या अकाउंटवरून केवळ १३ लोकांना फॉलो केलं जातं. तर जो बायडेन हे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केवळ ४६ लोकांना फॉलो करतात. त्यात गायिका लेडी गागाचाही समावेश आहे. तिने राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात परफॉर्म केलं होतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This model becomes the only celebrity followed on twitter by Biden's official account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.