Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:21 IST2025-08-27T16:20:22+5:302025-08-27T16:21:12+5:30
Mobile ban school News: दक्षिण कोरिया त्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे, ज्या देशांनी शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. पण, दक्षिण कोरियाने हा निर्णय का घेतला?

Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
Mobile Ban School Latest News: शाळेमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक दक्षिण कोरियामध्ये मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा लागू होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल अथवा इतर कोणतेही स्मार्ट डिव्हाईस वापरता येणार नाहीये. यापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली असून, दक्षिण कोरियाचाही त्यात समावेश झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण कोरियात शाळांमध्ये मोबाईल बंदीचा कायदा पुढील वर्षी म्हणजे मार्च २०२६ पासून अंमलात येणार आहे.
खासदार, पालक आणि शिक्षकांकडून शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाईल वापराबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये अनेक शाळांनी मोबाईल बंदीचा निर्णय लागू केला.
शाळांमध्ये मोबाईल बंदी का?
मुलांना मोबाईलचे व्यसन जडू लागले असून, त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मनावर होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरू लागली आहे. कारण त्यांचा अभ्यासाचा वेळही मोबाईल वापरण्यातच चालला आहे. मोबाईलची मुलांना लागत असलेलं व्यसन चिंताजनक असून, दक्षिण कोरियाच्या कायदेमंडळाने हा निर्णय घेतला. दक्षिण कोरियाच्या संसदेने बुधवारी हे विधेयक मंजूर केले. १६३ पैकी ११५ मते विधेयकाच्या बाजूने पडली.
कोणत्या देशांत शाळांमध्ये मोबाईल बंदी
दक्षिण कोरियापूर्वी अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली आहे. फिनलँड, फ्रान्सने मर्यादित स्वरूपात निर्बंध घातलेले आहेत. तिथे लहान मुलांनाच शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. तर नेदरलँड्स आणि चीनमध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.