शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:22 IST2025-06-26T21:21:09+5:302025-06-26T21:22:17+5:30

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:४४ वाजता सर्व अंतराळवीर अंतराळ स्थानकात उतरले.

mission axiom 4 Shubanshu Shukla receives a warm welcome at the International Space Station Watch VIDEO | शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

Axiom-4 Mission: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दाखल झाले आहेत. अंतराळ स्थानकात दाखल झाल्यानंतर, तेथील क्रू मेंबर्सनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. या अंतराळवीरांचा ISS मध्ये पोहोचल्यानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे.

अंतराळ स्थानकात उत्साहत स्वागत - 
भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:४४ वाजता सर्व अंतराळवीर अंतराळ स्थानकात उतरले. यावेळी तेथील क्रू मेंबर्सनी अ‍ॅक्सिओम-४ मिशन कमांडर पेगी व्हिटसन यांचे स्वागत केले. मिशन पायलट शुभांशू शुक्ला व्हिटसन यांच्या मागे होते. शुक्ला यांच्यासोबत पोलिश अभियंता स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की होते, ते मिशन स्पेशालिस्ट आणि युरोपियन स्पेस एजन्सी प्रकल्पाचे अंतराळवीर आहेत.

एक्सिओम मिशन-4 संदर्भात नासा -
पाचव्यांद अंतराळ उड्डाण केलेल्या व्हिटसन म्हणाल्या, "येथे येऊन आम्ही अत्यंत आनंदी आहोत. एकांतात राहण्याचा हा मोठा कालावधी होता." एखादी भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (नासा) एका निवेदनात म्हटले आहे की,  "स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान, अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत, चौथ्या खाजगी अंतराळवीर मोहिमेसाठी गुरुवार (२६ जून २०२५) सकाळी ६:३१ वाजता (भारतीय वेळेनुसार ४:०१ वाजता)आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले."

शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. यापूर्वी, भारताचे राकेश शर्मा १९८४ मध्ये आठ दिवस अंतराळात राहिले होते.
 

Web Title: mission axiom 4 Shubanshu Shukla receives a warm welcome at the International Space Station Watch VIDEO