डेटवर गेलेली अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे उडाली होती खळबळ, आता अशा अवस्थेत सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 17:19 IST2022-08-20T17:13:59+5:302022-08-20T17:19:58+5:30
Australia News : जेव्हा लॉराची काहीच माहीत मिळाली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. लॉराला शोधण्यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं.

डेटवर गेलेली अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे उडाली होती खळबळ, आता अशा अवस्थेत सापडली
Australia News : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून अचानक गायब झालेल्या 37 वर्षीय ऑस्ट्रेलियन अभिनेत्री लॉरा मॅकेलकचा पत्ता लागला आहे. लॉरा अमेरिकेच्या एका तुरूंगात सापडली आहे. ती एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर गेली होती, जिथे तिथे गोंधळ घातल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली. दुसरीकडे तिचे जवळचे लोक आणि फॅन्स ती गायब झाल्याने हैराण होते आणि तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. डेटवर गेल्यापासून लॉरा गायब झाली होती. एक तरूण तिला ऑनलाइन भेटला होता. ती अचानक गायब झाल्याने सगळेच चिंतेत होते.
जेव्हा लॉराची काहीच माहीत मिळाली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. लॉराला शोधण्यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं. त्यानंतरही तिचा काही पत्ता लागला नाही. लॉराचा शोध सुरूच होता. अशात लॉराचा शोध सुरू असताना समजलं की, ती तुरूंगात कैद आहे. हे समजल्यावर सगळेच हैराण झाले.
जेव्हा लॉरा डेटसाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होती तेव्हा तिचं एका दुसऱ्या कस्टमरसोबत भांडण झालं. ज्यानंतर रागात लॉराने दुसरा कस्टमर आणि त्याच्या दोन वर्षाच्या मुलावर ड्रिंक फेकलं होतं. त्यानंतर रेस्टॉरन्टकडून पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस जेव्हा लॉरासोबत बोलले तेव्हा ती नशेत होती. लॉराला जेव्हा पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांना मारहाण केली. तेव्हा तिला अटक करण्यात आली.
अचानक सगळं काही झाल्याने कुणालाच याबाबत काही माहिती नव्हती. एकीकडे तिला अटक झाली आणि दुसरीकडे तिचे मित्र आणि फॅन्स तिला शोधत होते. पण तिच्यासोबत असं काही होईल याचा कुणी विचारही केला नव्हता.