शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार; सरकारी कामेही सुरळीत सुरू राहणार, अमेरिकेत अखेर ४३ दिवसांनंतर शटडाउन संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:20 IST

United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले.  

वॉशिंग्टन - सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले.  

शटडाउनमुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे सुमारे दीड महिने वेतन थांबले होते. आरोग्यासह पोषण आहारासारख्या अनेक सरकारी योजनांच्या निधीला कात्री लावली होती. हजारो गरीब नागरिकांना फूड स्टॅम्प मिळत नव्हते. अमेरिकेतील हवाई सेवा पूर्ण कोलमडण्याच्या अवस्थेत आली होती. आता सर्व वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पुढील वर्षांसाठी सरकारने सर्व खात्यांना निधी पुरवण्याचे आश्वासन विरोधकांना द्यावे लागले. या तडजोडीत ट्रम्प प्रशासनाने ज्या कामगारांना नोकरीवरून काढले होते, त्यांनाही कामावर परत घेतले जाणार आहे.  

‘ट्रेन अमेरिकन्स अँड गो बॅक’विशिष्ट टॅलेंट असलेल्या परदेशी नागरिकांनी  अमेरिकेत येऊन अमेरिकेच्या नागरिकांना कौशल्याची कामे पाच-सात वर्षे शिकवावीत मग आपल्या देशात परत जावे, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच-वनबी व्हिसा समर्थनामागचा अर्थ असल्याचा युक्तिवाद ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेस्सेंट यांनी व्यक्त केला. 

‘सेमी कंडक्टर उद्योग अमेरिकेत हवा’बेस्सेंट म्हणाल्या, अमेरिकेत विशेष कौशल्य असलेले कर्मचारी नाहीत. अमेरिका सेमी कंडक्टर, जहाज बांधणी किंवा ज्यामध्ये अचूकता असते अशा वस्तूंचे २५-३० वर्षे उत्पादन करत नाही. त्यामुळे ट्रम्प यांना असे म्हणायचे आहे  की, अमेरिकेतील कामगार एका रात्रीत  जहाज वा क्षेपणास्त्रे वा चिप्स बनवू शकत नाही. त्याला ते काम आले पाहिजे, त्यासाठी त्याला तसे प्रशिक्षण घ्यावे लागेल. हे विशिष्ट टॅलेंट बाहेरून आम्हाला आणावे लागेल. आम्हाला देशात सेमी कंडक्टर उद्योग आणायचा आहे, असे बेस्सेंट म्हणाल्या.

विरोधकांवर ट्रम्प यांची टीकाशटडाउन संपल्यानंतर ट्रम्प यांनी विरोधकांनी आमच्याकडून खंडणी मागितली, पण आम्ही त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही. विरोधक अतिरेकीवादी आहे, त्यांना समस्या सहजासहजी सोडवायची नव्हती, असे आरोप केले.

English
हिंदी सारांश
Web Title : US Shutdown Ends After 43 Days; Salaries Released, Work Resumes

Web Summary : After 43 days, the US shutdown ended due to a bipartisan deal. Millions of government employees will receive delayed salaries. Work will resume, and Trump administration will rehire fired workers. The administration aims to boost domestic industries with skilled foreign workers.
टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प