Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:41 IST2026-04-07T12:38:42+5:302026-04-07T12:41:09+5:30

Donald Trump Warns Iran Over Strait of Hormuz: मध्य पूर्वेतील युद्ध भडकण्याची शक्यता असून इराणने पुढील २४ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी खुली न केल्यास त्यांना गंभीर परिमाण भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

Middle East War: Open Hormuz or Face Total Destruction: Donald Trump Issues Final 24-Hour Ultimatum to Iran | Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!

Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!

मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी खुली न केल्यास, मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत (अमेरिकन वेळेनुसार) मोठी लष्करी कारवाई केली जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. इराणने दिलेल्या मुदतीत व्यापार मार्ग खुला केला नाही तर त्यांचे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प लक्ष्य केले जातील, असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

अमेरिकेने इराणच्या नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दोन प्रमुख गोष्टींना लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. इराणमध्ये सुमारे ११० गॅस-आधारित पॉवर प्लांट्स आहेत. याशिवाय हायड्रो, न्यूक्लियर आणि कोळसा आधारित प्रकल्पही आहेत.हे प्रकल्प उद्ध्वस्त झाल्यास संपूर्ण इराण अंधारात जाण्याची शक्यता आहे. तसेच इराणमधील शहरांना जोडणारे मोठे पूल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे इराणची अंतर्गत कनेक्टिव्हिटी पूर्णपणे कोलमडून पडू शकते.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गातून होतो. इराणने हा मार्ग रोखून धरल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली असून कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, इराणने अमेरिकेची ही धमकी फेटाळून लावत ट्रम्प यांची भाषा अहंकारी असल्याचे म्हटले आहे. इराणच्या लष्करी कमांडने उलट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर ते देखील या भागातील तेल विहिरी आणि इतर महत्त्वाच्या तळांवर भीषण प्रतिहल्ला करतील.

पुढील २४ तास इराण आणि पर्यायाने संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर राजनैतिक चर्चा यशस्वी झाली नाही, तर मध्यपूर्वेमध्ये एका मोठ्या युद्धाचा भडका उडू शकतो, ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल.

Web Title : अमेरिका का ईरान को अल्टीमेटम: होर्मुज जलडमरूमध्य खोलो, वरना परिणाम भुगतो!

Web Summary : ट्रम्प की ईरान को चेतावनी: समय सीमा तक होर्मुज जलडमरूमध्य खोलें, अन्यथा बुनियादी ढांचे पर सैन्य कार्रवाई होगी। ईरान ने तेल कुओं पर जवाबी कार्रवाई की धमकी दी। वैश्विक अर्थव्यवस्था खतरे में।

Web Title : US Ultimatum to Iran: Open Hormuz Strait or Face Consequences!

Web Summary : Trump warns Iran: Open Hormuz Strait by deadline or face military action targeting infrastructure. Iran threatens retaliation on oil wells. Global economy at risk.