इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:32 IST2026-04-09T11:31:16+5:302026-04-09T11:32:53+5:30

America Warns Iran: तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंधांमधील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे चिन्ह दिसत आहे.

middle east war: America Warns Iran Over ceasefire, What Donald Trump said | इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात

इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात

तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंधांमधील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे चिन्ह दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास तर अमेरिका शांत बसणार नाही.त्यांना इतिहासातील सर्वात भीषण कारवाईला सामोरे जावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच  होर्मुज सामुद्रधुनीजवळ अजूनही अमेरिकेच्या युद्धनौका तैनात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "आम्ही इराणला एक संधी दिली आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची सुरक्षा कमी केली आहे. आमची ताकद इराणच्या उंबरठ्यावर उभी आहे. जर इराणने तात्पुरत्या युद्धविरामाचा फायदा घेऊन कोणताही विश्वासघात केला किंवा करार मोडला, तर त्यांच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि घातक कारवाई केली जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुजवर इराणचे कोणतेही नियंत्रण खपवून घेतले जाणार नाही. हा मार्ग खुला ठेवण्यासाठी अमेरिकन नौदल तिथे तैनात राहील. तसेच इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र बनवू न देणे, हे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असला तरी, त्याच्या अटींवरून दोन्ही देशांत अद्याप मोठे मतभेद आहेत. ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे हा युद्धविराम किती काळ टिकेल? याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. इराणच्या नवीन नेतृत्वासमोर आता ट्रम्प यांच्या अटी मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.

Web Title : ट्रंप की ईरान को चेतावनी: विश्वासघात का मतलब विनाश; होर्मुज के पास युद्धपोत तैनात।

Web Summary : ट्रंप ने ईरान को युद्धविराम का उल्लंघन करने के खिलाफ चेतावनी दी, गंभीर परिणाम भुगतने की धमकी दी। अमेरिकी युद्धपोत होर्मुज जलडमरूमध्य के पास तैनात हैं, जो इसकी खुलेपन को सुनिश्चित करते हैं। ईरान को परमाणु हथियार प्राप्त करने से रोकना एक प्राथमिकता है, जिससे युद्धविराम की अवधि के बारे में संदेह बढ़ रहा है।

Web Title : Trump warns Iran: Betrayal means destruction; warships remain near Hormuz.

Web Summary : Trump warned Iran against violating the ceasefire, threatening severe consequences. US warships remain near the Strait of Hormuz, ensuring its openness. Preventing Iran from acquiring nuclear weapons remains a priority, fueling doubts about the truce's longevity.