Mehul Choksi: "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:14 AM2021-07-16T00:14:08+5:302021-07-16T00:16:09+5:30

Mehul Choksi News: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी डॉमिनिकामधील हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर आता अँटिग्वामध्ये पोहोचला आहे. दरम्यान, अँटिग्वा येथे पोहोचताच मेहूल चोक्शीने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Mehul Choksi: the Indian intelligence agencies tried to kidnap me, Mehul Chokshi's big secret blast |  Mehul Choksi: "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट

 Mehul Choksi: "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट

Next

अँटिग्वा - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी डॉमिनिकामधील हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर आता अँटिग्वामध्ये पोहोचला आहे. दरम्यान, अँटिग्वा येथे पोहोचताच मेहूल चोक्शीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप मेहूल चोक्शीने केला आहे. (I couldn’t imagine after closing all my business&seizing all my properties, kidnapping attempt would be made on me by Indian Agencies)

डॉमिनिकामधून जामिनावर सुटका झाल्यानंतर मेहूल चोक्शी म्हणाला की, मी आज घरी परतलो आहे. मात्र गेल्या काही दिवसांत माझा जो छळ झाला  त्याचे ओरखडे माझ्या मनावर कायमचे गोंदले गेले आहेत. मला कल्पनाही नव्हती की, माझा सर्व व्यवसाय बंद करून माझ्या सर्व मालमत्तेवर जप्ती आणल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा माझ्या अपहरणाचा प्रयत्न करतील.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला होत. भारतातून पळून गेलेला आणि सध्या डॉमिनिकामध्ये अटकेता असलेला व्यावसायिक मेहूल चोक्शी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी मेहूल चोक्शी याला देण्यात आली होती. त्यानंतर मेहूल चोक्शी आता पुन्हा अँटिग्वामध्ये दाखल झाला आहे.

मेहूल चोक्शीवर पीएलबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता विचारात घेऊन अँटिग्वामध्ये फरार झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्या तो डॉमिनिका येथे पोहोचला होता. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली होती.  

Web Title: Mehul Choksi: the Indian intelligence agencies tried to kidnap me, Mehul Chokshi's big secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.