लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 14:37 IST2018-07-19T14:21:06+5:302018-07-19T14:37:11+5:30
पृथ्वीच्या इतिहासाबाबत शास्त्रज्ञांनी महत्वाचा शोध लावला आहे. या युगाचे नाव भारतातील एका राज्याच्या नावावरुन केले आहे.

लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध
नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.
हे नाव मेघालय राज्यातील 'मॉवम्लुह' या गुहेतील' स्टॅलॅगमाईट'वरुन पडलेले आहे. ज्यावेळेस चुनखडकाच्या गुहेमध्ये पाण्याचे थेंब पडत असलेल्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन केवळ क्षारांचे संचयन मागे राहाते तेव्हा त्या गुहेत जमिनीवर क्षारांचे खांब तयार होतात त्यास 'स्टॅलॅगमाईट' असे म्हणतात. ही प्रक्रीया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. ज्यावेळेस हे थेंब थेंब पाणी पडून गुहेच्या छताला लटकणारे खांब तयार होतात तेव्हा त्यास स्टॅलॅकमाइट असं म्हटलं जातं.
The stalagmite from India with the GSSP for the base of the Meghalayan Stage (beginning of Meghalayan Age).https://t.co/ginCzDbKYS#Holocene#Meghalayan#GSSPpic.twitter.com/VV82P9AYVR
— IUGS (@theIUGS) July 14, 2018
मेघालय युगाचे पुरावे सर्व खंडांमध्ये सापडलेले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी होलोसीन युग या कालखंडाचे तीन भाग केलेले आहेत. यामध्ये सुरुवातीचा काळ ग्रीनलँडीयन एज काळ येतो. हा काळ 11, 700 वर्षे पूर्वी सुरु झाला. त्यानंतर 8300 वर्षांपूर्वी नॉर्थग्रीपीयन कालखंड सुरु होतो आणि सर्वात शेवटी 4,200 वर्षे मेघालयन एज म्हणजे मेघालय युगाची सुरुवात होते. मेघालय युगाची सुरुवात अत्यंत मोठ्या दुष्काळांनी सुरुवात झाली. हा दुष्काळ सलग 200 वर्षे राहिला. त्यानंतर हिमयुगाच्या शेवटी निर्माण झालेल्या कृषी आधारित समाजांवर हवामानातील बदलांमुळे मोठा परिणाम झाला होता. इजिप्त, युनान, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया आणि सिंधु संस्कृती, यांगत्से नदीजवळील संस्कृतीवर याचा परिणाम झाला होता असे शास्त्रज्ञांचे मत आहे.