पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 20:28 IST2025-04-29T20:26:41+5:302025-04-29T20:28:24+5:30

Pakistan Government vs Sindh Province Fight Chaos: पाकिस्तानला केवळ भारतच नव्हे तर त्यांच्याच देशातील सिंध प्रांताच्या नागरिकांनी धारेवर धरलं आहे

massive protests erupts in pakistan sindh province against government ambitious canal projects | पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...

पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...

Pakistan Government vs Sindh Province Fight Chaos: काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. भारत केव्हा पाकिस्तानवर चाल करून येईल, याची त्यांनाही कल्पना नाही. असे असताना पाकिस्तान सरकारला अंतर्गत असंतोषालाही तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे भारताने सिंधू पाणी करार अंशतः स्थगित केला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक असलेल्या सिंध प्रांतात सध्या तणाव आहे. सिंध प्रांतात लष्कर आणि केंद्र सरकारविरुद्ध मोठे निदर्शने सुरू आहेत. हे प्रकरण सिंधमध्ये बांधल्या जाणाऱ्या ६ कालव्यांच्या वादग्रस्त योजनेबद्दल आहे.

'ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह' अंतर्गत सिंधू नदीवर पाच आणि सतलजवर एक कालवा सुरु करण्यात आला. पण सिंधचे लोक याला पंजाब आणि सैन्याची लुटमार योजना म्हणत आहेत. सरकारने प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली असली तरी, लोक अजूनही महामार्गावर रास्ता रोको करून जनजीवन सुरळीत होण्यास अडथळा निर्माण करत आहेत.

कालव्याचे नियोजन की पाणी चोरी?

पाकिस्तानात गेल्या १२ दिवसांपासून याबाबत निदर्शने सुरू आहेत. हजारो लोक रस्त्यावर उतरली आहेत. व्यवसाय बंद आहेत आणि पंजाबला येणारे आणि मुख्य रस्ते अडवण्यात आले आहेत. कराची बंदरातून देशभरात माल घेऊन जाणारे ट्रकही रस्त्यावर अडकले आहेत. या संकटात जवळपास एक लाख चालक आणि मदतनीस अडकले आहेत. ही योजना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह (GPI) चा एक भाग आहे, ज्याची किंमत ३.३० अब्ज डॉलर्स इतकी आहे. यामुळे पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानमधील ४८ लाख एकर नापीक जमिनीला सिंचन मिळेल, असा दावा केला जात आहे.

सिंधच्या लोकांच्या चिंता काय आहेत?

हा प्रकल्प लष्कराच्या एका खाजगी कंपनीद्वारे चालवला जाईल आणि त्याद्वारे आधुनिक कृषी तंत्रांद्वारे पाकिस्तानची डबघाईला आलेली शेती पुनरुज्जीवित केली जाईल, असे सांगितले जात होते. पण सिंधच्या लोकांना शंका आहे की या योजनेमुळे त्यांना आतापेक्षाही कमी पाणी मिळेल. १९९१ च्या पाणी कराराअंतर्गत सिंधला आधीच त्यांच्या वाट्यापेक्षा २०% कमी पाणी मिळत आहे आणि आता रब्बी हंगामात ही तूट ४५% पर्यंत पोहोचली आहे. पर्यावरण कार्यकर्ते झुल्फिकार अली भुट्टो ज्युनियर म्हणाले की ही योजना सामान्य लोकांच्या कल्याणासाठी नाही तर पिकांच्या नफ्यासाठी आहे. त्यामुळे सिंधमधील लोक संतप्त आहेत.

Web Title: massive protests erupts in pakistan sindh province against government ambitious canal projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.