अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला; नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणांवर एअरस्ट्राईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:54 IST2026-03-02T08:22:14+5:302026-03-02T10:54:29+5:30

जर पाकिस्तानकडून पुन्हा आमच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्यात आले तर अशाचप्रकारे आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा अफगाणिस्तानने दिला.

Massive attack on Pakistan; Airstrikes on many places including Nur Khan airbase by Afghanistan Taliban | अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला; नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणांवर एअरस्ट्राईक

अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला; नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणांवर एअरस्ट्राईक

काबुल - मध्य पूर्वेत गल्फ देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्धाचा भडका उडाला आहे. अफगाणिस्ताननेपाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानकडून अलीकडच्या काळात अफगाण क्षेत्रात झालेल्या कारवाईविरोधात अफगाणिस्तानातील तालिबानी प्रशासनाने पाकला प्रत्युत्तर दिले आहे. 

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केलाय की, आमच्या हवाई दलाने रावलपिंडी येथील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील १२ वी तुकडी, खैबर पख्तूनख्वा येथील मोहम्मद एजेन्सी परिसर आणि घलानी इथल्या सैन्य तळांना टार्गेट करण्यात आले आहे. या ठिकाणांवर अत्यंत अचूकपणे टार्गेट हल्ला करण्यात आला. ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाकिस्तानी सैन्याने काबुल, बगराम एअरबेस आणि काही सैन्य परिसरात मध्यरात्री आणि आज पहाटे हवाई हल्ले केले आहे त्याला हे प्रत्युत्तर दिले त्यांनी सांगितले.

तसेच जर पाकिस्तानकडून पुन्हा आमच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्यात आले तर अशाचप्रकारे आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानला या हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल असा इशाराही तालिबानने दिला आहे. सध्या या दाव्यांवर पाकिस्तानकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संघर्षामुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये जोरदार स्फोटाचे आवाज ऐकायला आले आहेत असं वृत्त अल जजीरा वृत्तसंस्थेने दिले होते. अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानी विमानांवर फायरिंग करण्यात आली आहे. गेल्या ४ दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानी जेट अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले ज्यानंतर एंटी एअरक्राफ्ट आणि मिसाइल डिफेन्स प्रणाली तैनात करून अफगाणिस्ताननेही पाकला उत्तर दिले. त्याशिवाय पाकिस्तानी विमानांनी बगराम एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु हा हल्ला अफगाणिस्तानने उलथवून लावला.  

Web Title : हवाई क्षेत्र उल्लंघन के बाद अफ़ग़ानिस्तान ने पाकिस्तान पर हमला किया; तनाव बढ़ा

Web Summary : पाकिस्तान द्वारा हवाई क्षेत्र के उल्लंघन के बाद अफ़ग़ानिस्तान ने नूर खान एयरबेस सहित सैन्य ठिकानों पर हवाई हमले किए। तालिबान ने उल्लंघन जारी रहने पर आगे कार्रवाई की चेतावनी दी है। पाकिस्तान ने आधिकारिक तौर पर जवाब नहीं दिया, काबुल में विस्फोटों और चार दिनों के संघर्ष के बाद क्षेत्रीय तनाव बढ़ गया।

Web Title : Afghanistan Strikes Pakistan After Airspace Violation; Tensions Escalate

Web Summary : Afghanistan retaliated against Pakistan with airstrikes on military bases, including Nur Khan Airbase, following alleged Pakistani airspace violations. Taliban warns further action if violations continue. Pakistan hasn't officially responded, escalating regional tensions after Kabul explosions and four days of conflict.