mask wearers are always infected says us president donald trump | मास्क लावणारे नेहमीच असतात कोरोनाग्रस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त विधान

मास्क लावणारे नेहमीच असतात कोरोनाग्रस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. तसेच "माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका" असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र आता ट्रम्प यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 

"मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात" असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. 26 सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता नेहमी मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन पोस्ट या व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा यातील काही पोस्ट अथवा मेसेज हे फेक असतात. अशाच फेक, धोकादायक आणि हिंसक पोस्टबाबत फेसबुकने कठोर पावलं उचलली आहे. काही कारणास्तव अशा पोस्ट अनेकदा डिलीट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील एक पोस्ट फेसबुकने आता डिलीट केली होती. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अ‍ॅक्शन घेतली. फेसबुकने ट्रम्प यांची कोरोना व्हायरससंबंधीची एक पोस्ट डिलीट केली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये कोरोना व्हायरस हा फ्लू सारखाच असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकने ही पोस्ट हटवली असली तरी त्याआधी तब्बल 26,000 हून अधिक वेळा ती शेअर केली गेली होती. फेसबुकच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासारख्या गंभीर आजाराबाबत चुकीची माहिती देणारी पोस्ट आम्ही हटवली. यासोबतच ट्विटरने देखील त्यांच्या एका पोस्टवर वॉर्निंग लेबल लावलं होतं. कोरोना संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असेल अथवा एखाद्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल तर ते वॉर्निंग लेबलवरून सांगितलं जातं. ऑगस्टमध्ये फेसबुकने कोरोना संदर्भातील ट्रम्प यांची एक पोस्ट हटवली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mask wearers are always infected says us president donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.