शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

'मला माफ करा', मार्क झुकेरबर्ग यांनी मागितली जाहीर माफी; जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 3:27 PM

अमेरिकेतील अनेक पीडित कुटुंबियांनी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mark Zuckerberg's Apology: मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या फेसबुकवर अनेकदा विविध प्रकारचे आरोप लागले आहेत. यामुळे कंपनीला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. आता ताजे प्रकरण न्यूडीटी आणि शोषणासंदर्भातील आहे. अमेरिकेतील सिनेटमध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी मेटा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना सर्वांसमोर पीडित कुटुंबियांची माफी मागावी लागली. नेमकं काय झालं?

अमेरिकन सिनेटमध्ये इंस्टाग्राम न्यूडीटी आणि शोषणासंबंधी सुनावणी सुरू होती. मुलांचे नुकसान/शोषण होऊ नये, यासाठी मेटाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला. कॅपिटल हिलच्या हाऊस फ्लोअरवर झालेल्या सुनावणीदरम्यान, मेटा प्रमुखाला सिनेटकडून सांगण्यात आले की, इंस्टाग्रामवर 13 ते 15 वर्षे वयोगटातील 37 टक्के मुलींना एका आठवड्यात अचानक न्यूडीटी आणि शोषणाचा सामना करावा लागला. यावर त्यांनी कोणती कारवाई केली आणि जबाबदार व्यक्तीला नोकरीतून काढून टाकले का? 

यावेळी यूएस सिनेट न्यायिक समितीचे सदस्य जोश हॉले यांनी झुकेरबर्ग यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पालकांचे गंभीर आरोप आणि सिनेटचे प्रश्न ऐकून मार्क यांचा चेहरा फिका पडला, त्यांना एकाही प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. अनेकवेळा प्रश्न विचारल्यानंतर झुकरबर्ग म्हणाले, मी याचे उत्तर देणार नाही. यावर आता बोलणे योग्य नाही. यानंतर जोश यांनी मेटावर गंभीर आरोप करणाऱ्या पीडित कुटुंबीयांची माफी मागण्याचा दबाव झुकेरबर्ग यांच्यावर टाकला. 

अखेर मागितली माफी यानंतर सिनेट म्हणाले, तुम्ही कोणतीच कारवाई केली नाही. ना कुणाला काढले, ना एकाही पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई दिली. सध्या पीडितांची कुटुंबे इथे आली आहेत, तु्ही आज तरी या लोकांची माफी मागणार का? हे ऐकून मार्क झुकरबर्गची जीभ अडखळली. जोश हॉले त्यांच्यावर वारंवार माफी मागण्यासाठी दबाव टाकत होते. मार्क यांना काहीच बोलता अले नाही. अखेर मेटा सीईओ मागे वळाले आणि तिथे उपस्थित पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. सुनावणीदरम्यान सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीही मेटा सीईओवर ताशेरे ओढले. 

सोशल मीडिया कंपन्यांवर काय आरोप?मेटा सीईओ व्यतिरिक्त, स्नॅप इंकचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याबद्दल पीडितांच्या कुटुंबियांची माफी मागितली. दरम्यान, अमेरिकेतील वाढत्या ऑनलाइन गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त X, Snap, TikTok यासह अनेक कंपन्यांचे अधिकारी कॅपिटल हिलमध्ये उपस्थित होते. या कंपन्यांवर आरोप आहे की, त्यांनी असे काही फीचर तयार केले आहे, ज्यामुळे बालगुन्हे आणि आत्महत्यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका