दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:32 AM2019-08-13T03:32:33+5:302019-08-13T03:33:33+5:30

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी. विशेष म्हणजे, मेरीने हे संशोधनकार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलंआहे.

Marie Curie, the winner of two Nobel Prizes | दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी

दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी मेरी क्युरी

googlenewsNext

- हेमंत लागवणकर
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी. विशेष म्हणजे, मेरीने हे संशोधनकार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलंआहे.

मेरी क्युरीचा जन्म पोलंड देशात १८६७ साली झाला.तिला चार बहिणी होत्या. मेरी या बहिणींमध्येसगळ्यात लहान. मेरीचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने ती वाचायला आणि लिहायला लवकर शिकली. ती लहानपणापासूनच बुद्धिमान आणि तल्लख होती. मेरी दहा वर्षांची असताना झोफियाचा म्हणजे तिच्या बहिणीचा टायफस रोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दोनच वर्षांनी मेरीची आई क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडली.

पोलंडवर त्या वेळी रशियाची राजवट होती. त्यामुळे पोलंडमधल्या लोकांना पोलिश भाषेत लिहिण्याची किंवा वाचण्याची परवानगी नव्हती. जुलमी रशियन राजवटीविरुद्ध त्या काळी झालेल्या राष्ट्रीय उठावामध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून मेरीच्या आई आणि वडील दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना आपली सगळी मालमत्ता आणिसंपत्ती गमवावी लागली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्णझाल्यावर मेरीला पुढच्या शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. पण, पोलंडमध्ये विद्यापीठांतून केवळपुरुषांनाच प्रवेश दिला जात असे. फ्रान्समध्ये जाऊनमेरीला पुढचं शिक्षण घेता आलं असतं; पण मेरीकडे तेवढेपैसे नव्हते. मात्र, तिने आपल्या मोठ्या बहिणीचं वैद्यकीय शिक्षण फ्रान्समध्ये सुरळीत व्हावं म्हणून वेगवेगळ्यानोकऱ्या करून पैसे जमवले आणि बहिणीला डॉक्टर केलं.त्यानंतर मेरीसुद्धा फ्रान्सला गेली आणि पुढचं शिक्षण घेऊन विज्ञान संशोधन कार्याकडे वळली. मेरी क्युरीने पोलोनिअम आणि रेडिअम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला आणि किरणोत्सारी मूलद्रव्यांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं. 
(लेखक विज्ञान प्रसारक व शैक्षणिक सल्लागार आहेत.)
hemantlagvankar@gmail.com

Web Title: Marie Curie, the winner of two Nobel Prizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.