शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 08:11 IST

इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली.

इस्रायलनेइराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'IRNA' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, दक्षिण इराणमधील होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरात असलेल्या एका मुलींच्या शाळेवर अमेरिका आणि इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या भीषण हल्ल्यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. अलीकडील लष्करी मोहिमेदरम्यान हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दावा केला आहे की, आज पहाटे अमेरिकेने झिओनिस्ट राजवटीसह (इस्रायल) देशातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. परिषदेने म्हटलं आहे की, "शत्रूला वाटतं की अशा कारवायांनी इराणची जनता दबावाखाली येईल, परंतु तसं होणार नाही."

पुढे असं म्हटलं आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. सरकारने जनतेला आश्वस्त केलं आहे की, जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून घाबरण्याचं काही कारण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि विद्यापीठे बंद राहतील, तर बँका सेवा सुरू ठेवतील आणि सरकारी कार्यालये सध्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करतील.

आम्हाला युद्ध नको होतं - इराण

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, अमेरिका आणि झिओनिस्ट राजवटीने देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केलं आहे. त्यांनी अनेक संरक्षण प्रतिष्ठाने, पायाभूत सुविधा आणि नागरी भागांना लक्ष्य केलं आहे. मंत्रालयानुसार, लष्करी धोका असतानाही इराणने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विविध देशांशी संवादाचा मार्ग निवडला होता, जेणेकरून तणाव टाळता येईल.

इराणी जनतेने युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु सध्याच्या परिस्थितीत देशाचं रक्षण करणं आणि शत्रूच्या लष्करी कारवाईचा सामना करणं अनिवार्य झालं आहे. इराण चर्चेसाठी जसा तयार होता, तसाच तो कोणत्याही युद्धाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे आणि त्यांचे सशस्त्र दल हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देतील. इराणने कधीही बाह्य आक्रमणापुढे गुडघे टेकले नाहीत आणि यावेळीही प्रत्युत्तर असं असेल की हल्लेखोरांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल असंही मंत्रालयाने म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Israel Airstrike Devastates Iranian School, Killing 85 Students: Report

Web Summary : An alleged US-Israeli airstrike on a girls' school in Iran's Hormozgan province resulted in 85 student deaths, according to Iranian state media. Iran claims it will retaliate, assuring citizens of sufficient supplies despite school closures and partial government operations. Iran says it sought dialogue but will defend itself strongly.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धSchoolशाळाDeathमृत्यू