मैत्रिणीचा मृत्यू दिसत होता तरीही तिच्याशी केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 05:10 IST2021-10-26T05:09:41+5:302021-10-26T05:10:10+5:30

True Love Never Dies: एक दिवस नोकरीवरून येत असताना एण्णा लेगरची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. एण्णांला अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बॉयफ्रेंड ग्रेग पीटर्ससह कुटुंबही उपस्थित होते. 

A man married his dying girlfriend in ICU pdc | मैत्रिणीचा मृत्यू दिसत होता तरीही तिच्याशी केले लग्न

मैत्रिणीचा मृत्यू दिसत होता तरीही तिच्याशी केले लग्न

लंडन : ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या गर्लफ्रेंडचा कार अपघातात मृत्यू झाला. त्याने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते; पण त्याआधी तिचा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांना विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला पत्नीच्या रुपात बघायचे होते.

‘द सन यूके’ च्या वृत्तानुसार, व्यायामशाळेचा व्यवस्थापक ग्रेग पीटर्स (३४) आणि एण्णा लेडगर (२८) एकमेकांच्या खूप प्रेमात होते. दोघांची भेट झाली ती फक्त १८ महिन्यांपूर्वी. ते लग्नाचे नियोजन करत होते. दोघांच्या कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. पण एका अपघाताने सगळेच बदलून गेले.

एक दिवस नोकरीवरून येत असताना एण्णा लेगरची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. एण्णांला अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बॉयफ्रेंड ग्रेग पीटर्ससह कुटुंबही उपस्थित होते. 

काही अवयवदान
एण्णा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत, ग्रेगने आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी घालून तिला आपली पत्नी बनवले. काही काळानंतर एण्णांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या संमतीने तिचे काही अवयव दान करण्यात आले. ज्यातून ६ लोकांना नवे जीवन मिळाले.

Web Title: A man married his dying girlfriend in ICU pdc

टॅग्स :marriageलग्न